जाधववाडी येथील कोरोना पॉझिटिव्ह नऊ व्यक्ती कोणताही उपचार न घेता व परवानगीशिवाय घरी थांबल्याची माहिती स्थानिक कोरोना समितीने करकंब पोलिसांना दिली. याबाबत सपोनि प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने समक्ष जाऊन खात्री करून संबंधित नऊ व्यक्तींवर साथरोग प्रतिबंधक अधिनियम, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कायद्यांतर्गत पोना सचिन गावडे यांनी करकंब पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित कोरोनाबाधित व्यक्तींना आष्टी (ता. मोहोळ) येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले आहे. यावेळी सरपंच, पोलीस पाटील, आशा वर्कर आदी उपस्थित होते.
कोट :::::::::::::::::::::
जिल्हाधिकाऱ्यांनी घरांमध्ये उपचारासाठी कोणीही थांबणार नाही, अशा प्रकारचा आदेश काढला आहे. यापुढे करकंब पोलीस ठाणे हद्दीत कोणीही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण घरात उपचारासाठी थांबलेला दिसल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. सध्या कोणी घरात उपचार घेत असल्यास त्यांनी तत्काळ कोविड केअर सेंटर अथवा डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये भरती व्हायचे आहे.
- प्रशांत पाटील
सहायक पोलीस निरीक्षक, करकंब