शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रसेवा समूहाकडून लेखी पत्राद्वारे उजनी आंदाेलकांना साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:23 IST

भीमानगर : उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूरला नेण्याचे नियोजन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले होते. या निर्णयाला विरोध ...

भीमानगर : उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूरला नेण्याचे नियोजन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले होते. या निर्णयाला विरोध म्हणून उजनी धरणावर काही संघटना आंदाेलन करत आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रसेवा समूहाचे प्रवक्ते योगेश जाधव व त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना भेटून आपली साथ असल्याचा लेखी पाठिंबा दिला.

जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली उजनी धरणाच्या गेटवर इंदापूरला पाणी निर्णयाच्या निषेधार्थ आंदोलन चालू आहे. जलसंपदामंत्र्यांनी हा निर्णय रद्द झालेला आहे, असे जाहीर केले तरी हे आंदोलन बंद झालेले नाही. जोपर्यंत लेखी आदेश आम्हाला मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार असल्याचा इशारा प्रभाकर देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेला आहे.

पुणे येथील राष्ट्रसेवा समूह या संघटनेने उजनी धरणावर चालू असलेल्या आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा दिलेला आहे. या संघटनेचे प्रवक्ते योगेश जाधव यांनी उजनी पाणीप्रश्नी भविष्यात कुठलेही आंदोलन केले तरी त्यात सहभागी होण्याचे आश्‍वासन या आंदोलकांना दिलेले आहे. यावेळी धनेश भगत, हनुमंत खताळ, काका चव्हाण, केशव शेंडगे, सर्जेराव बोरकर यांच्यासह, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. सुहास पाटील, प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता व्यवहारे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, प्रहार संघटनेचे जिल्हासंघटक विठ्ठल मस्के, बळीराम गायकवाड, अण्णा जाधव-पाटील, बळीराजा संघटनेचे जिल्हाध्यक्ष माउली हळणवर आदी उपस्थित हाेते.

----