ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 2 - वडिलांच्या पार्थिवाचे देहदान करण्यासाठी निघालेल्या कुटुंबाच्या कारला अपघात झाला. यात चार जण जखमी झाले आहेत. सोलापूरपासून 17 किलोमीटर अंतरावर असलेल्या नान्नज गावाजवळ सकाळी 11.45 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
बार्शी येथे निधन झालेल्या वडिलांचे देहदान करण्यासाठी त्यांचे नातेवाईक सोलापूर येथील व्ही एम मेडिकल कॉलेजमध्ये निघाले होते. डेडबॉडी शववाहिकेत होती तर इतर लोकं कारमध्ये बसले होते. सोलापूरजवळ आल्यावर समोरुन येणारी एसटीबसची कारला धडक बसली.
यात कारमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले. मात्र कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.