शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

अबब...! विंगरमध्ये आढळली ५० मुले, सोलापूर धोकादायक विद्यार्थी वाहतूक

By admin | Updated: June 21, 2017 11:27 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २१ : धोकादायकरीत्या रिक्षा व कारमधून शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या १७ वाहनांवर आरटीओ व शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या संयुक्त पथकाने मंगळवारी सकाळी कारवाई केली. पथकाच्या तपासणीत मारुती व्हॅनमध्ये २५ तर विंगरमध्ये ५० विद्यार्थी आढळले. ‘लोकमत’च्या ‘हॅलो सोलापूर’मध्ये ‘विद्यार्थी वाहतूक सुरक्षा वाऱ्यावर’ या मथळ्याखाली १९ जूनच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केले होते. मनपा परिवहनच्या ताफ्यातील बसची संख्या कमी झाल्याने निर्माण झालेल्या समस्येचे चित्रण यात मांडले आहे. या वृत्ताची दखल पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी घेतली. धोकादायकरित्या होणाऱ्या विद्यार्थी वाहतुकीच्या वाहनांवर कारवाई करण्याचे त्यांनी आदेश वाहतूक विभागाला दिले. यावर पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण यांनी सोमवारी सायंकाळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे, वाहतूक नियंत्रण शाखेच्या सहायक पोलीस आयुक्त वैशाली शिंदे, सहायक परिवहन अधिकारी सतीश जाधव यांच्यासमवेत बैठक घेतली व कारवाईच्या सूचना दिल्या. आरटीओ व वाहतूक नियंत्रण विभागाच्या पोलिसांनी मार्केट पोलीस चौकी व सिद्धेश्वर मंदिर प्रवेशद्वारासमोर थांबून शाळांकडे येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली. सकाळी साडेसात ते साडेनऊ या दोन तासांत १७ वाहनांवर पथकाने कारवाई केली. शाळेसमोर रिक्षा थांबल्यावर त्यातून उतरणारे विद्यार्थी पोलिसांनी मोजले. क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी असणारी वाहने ताब्यात घेण्यात आली. यात १२ रिक्षा, एक विंगर, चार मारुती ओम्नी व्हॅनचा समावेश आहे. विंगरमध्ये ५० तर एका ओम्नी व्हॅनमध्ये २५ विद्यार्थी आढळले. पोलिसांनी अवैधपणे विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने ताब्यात घेतली. या प्रकरणी क्षमतेपेक्षा जादा सीटाप्रमाणे दंड आकारण्यात आला आहे. त्यामुळे रिक्षाचालक संतप्त झाले. त्यांनी कारवाईची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली. त्यामुळे काही जण तेथे आले व कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला. ही माहिती मिळताच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे तेथे सायकलवरून आले व त्यांनी तक्रारदारांना कायदेशीर बाबींची माहिती दिली. वाहतूक विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त वैशाली शिंदे याही कारवाईच्या ठिकाणी हजर झाल्या. कारवाईत वाहतूक नियंत्रण विभागाचे फौजदार चौगुले, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश जाधव, मोटार वाहन निरीक्षक नंदकुमार काळे, अर्चना घाणेगावकर, अनुपमा पुजारी, हजारे यांनी भाग घेतला. अशी तपासणी मोहीम शहरात विविध भागात अचानकपणे घेण्यात येणार आहे.----------------------मुख्याध्यापकांनी भाडे ठरवावेपालक रिक्षाचालकांना महिन्याला भाडे कमी देतात. त्यामुळे जादा विद्यार्थी घ्यावे लागतात, अशी प्रतिक्रिया रिक्षाचालकांनी व्यक्त केली. याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी खरमाटे यांना विचारले असता ते म्हणाले की, ही वस्तुस्थिती असली तरी कायद्याप्रमाणेच प्रवासी घ्यावे लागतील. रिक्षा किंवा स्कूलबसचे भाडे ठरविण्याचे अधिकार शालेय समितीचे अध्यक्ष या नात्याने मुख्याध्यापकांना आहेत. मुख्याध्यापक, पालक व स्कूलबस चालकांनी एकत्रित बसून विशिष्ट भाडे ठरविल्यास त्याला मान्यता दिली जाईल. मुख्याध्यापकांनी कायदेशीर अडचण लक्षात घेता रिक्षाचालकांना भाडे वाढवून देण्याबाबत भूमिका घ्यावी व सुरक्षित वाहतुकीवर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. -----------------------------चालकाचे परवाने निलंबितक्षमतेपेक्षा जादा विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या विंगर व मारुती ओम्नी कारच्या चालकाचा वाहनपरवाना एक महिन्यासाठी निलंबित करण्याचे आदेश उपप्रादेशिक परिवहन अधिकारी खरमाटे यांनी दिले आहेत. दोषी ठरलेल्या वाहनांमध्ये आसनरचनेत बदल केल्याचे आढळले. जादा विद्यार्थी बसावेत या उद्देशाने मारुती ओम्नी व विंगरचे आसन आडव्याऐवजी उभ्या स्थितीत मांडल्याचे दिसले. अशी वाहतूक विद्यार्थ्यांच्या दृष्टीने धोकादायक आहे. त्यामुळे याबाबत संबंधित वाहनधारकांना दंड करण्यात येणार आहे.