शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यात ९ लाख २० हजार वृक्षांची लागवड

By admin | Updated: July 13, 2017 14:41 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १३ : राज्य शासनाच्या वन विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या चार कोटी वृक्ष लागवड मोहिमेत सोलापूर जिल्ह्यात ९ लाख २० हजार ४०२ वृक्ष लागवड करण्यात आली. जिल्ह्याच्या उद्दिष्टाच्या १८४.८ टक्के वृक्ष लागवड झाली असल्याची माहिती उपवनसंरक्षक संजय माळी यांनी दिली आहे. यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेने सर्वाधिक म्हणजे ३ लाख ७४ हजार ७५५ वृक्ष लागवड करुन अन्य विभागापेक्षा आघाडीवर आहे. सोलापूर जिल्ह्याला पाच लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखालील समितीने जिल्ह्यात ९ लाख ३४ हजार वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले होते. मात्र त्यापैकी ९ लाख २० हजार ४०२ वृक्ष लावण्यात विविध शासकीय कार्यालयांना शक्य झाले आहे. यामध्ये सर्वाधिक वृक्षारोपण जिल्हा परिषद कार्यालयाकडून करण्यात आले आहे. सोलापूर जिल्हा परिषदेने ३ लाख ७४ हजार ७५५ वृक्षारोपण केले आहे. त्यापाठोपाठ उपवनसंरक्षक कार्यालयाने ३ लाख ३८ हजार १०० वृक्षारोपण करुन दुसऱ्या क्रमांकावर आघाडी घेतली आहे. ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेत पुढील वर्षी राज्यभरात १३ कोटी वृक्ष लागवड करण्याचे निश्चित करण्यात आल्याचे उपवनसंरक्षक माळी यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात सर्वत्र वृक्षलागवड करण्यासाठी विविध शासकीय कार्यालयांना उद्दिष्ट देण्यात आले होते. यामध्ये उपवनसंरक्षक वनविभागास ३,२६,९९० उद्दिष्ट दिले होते, त्यापैकी ३,३८,१०० वृक्षांची लागवड केली. विभागीय वन अधिकारी कार्यालयाने १ लाख ८ हजार ३०० लागवड केली. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून ५६ हजार ९५, सोलापूर महापालिकेने ६ हजार ४१६, कार्यकारी अभियंता, सा.बां.वि, सोलापूर - १९९५, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सोलापूर- ५२०, जि.प. शिक्षण अधिकारी माध्यमिक/प्राथमिक - १० हजार २४०, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर- ४००, पोलीस आयुक्त, सोलापूर- १०५०, पोलीस अधीक्षक, सोलापूर १२१७, प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास विभाग- १ हजार, जिल्हा आरोग्य विभाग, सोलापूर - ३ हजार ४०९, अधीक्षक अभियंता शहरी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी, सोलापूर- १ हजार, जिल्हा उत्पादन शुल्क विभाग- ५००, मध्यवर्ती कारागृह, सोलापूर- ५०, भूजल व सर्व्हेक्षण विभाग, सोलापूर- १००, कोषागार अधिकारी, कार्यालय- १००, परिवहन विभाग- १०७५, जिल्हाधिकारी कार्यालय- ३ हजार, जिल्हा महिला व बालकल्याण विभाग- ३१०, कार्यकारी अभियंता जीवन प्राधिकरण, सोलापूर- ५००, जिल्हा परिषद ३ लाख ७४ हजार ७५५, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण- १७८०, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय- २ हजार, एम.आय.डी.सी. चिंचोळी- २ हजार, वन्यजीव विभाग नान्नज/करमाळा- १ हजार, वैयक्तिक १०२ अशा विविध शासकीय कार्यालयांचा समावेश आहे. ---------------------------विविध विभागांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद च्शासनाने यंदा महाराष्ट्रात ४ कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेमध्ये सोलापूर जिल्हा परिषद आणि उपवनसंरक्षण विभागाने अनुक्रमे प्रथम, द्वितीय क्रमांकावर आघाडी घेतली असताना त्या खालोखाल विभागीय वन अधिकारी कार्यालयाने तिसरे स्थान पटकावले आहे. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने ५६ हजार वृक्षांची लागवड करुन उद्दिष्टपूर्ती करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना ६० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. महापालिकेने उद्दिष्टाहून अधिक वृक्ष लागवड केली.