शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

उसाप्रमाणेच दूध दरासाठीही ७०:३० चा फॉर्म्युला, हिवाळी अधिवेशनात कायदा करणार, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 11:06 IST

खासगी दूध संघावर कसलेही नियंत्रण नसल्याने दुधाचे दर त्यांच्या सोईने दिले जात असल्याचे आम्हाला दिसत असल्यानेच उसाच्या दरासाठी असलेला ७०:३० चा फॉर्म्युला दुधालाही लागू करण्यात येणार असून त्यासाठीचा कायदा येत्या हिवाळी अधिवेशनात मंजूर केला जाणार असल्याचे राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

ठळक मुद्देराज्यातील एकूण दुधापैकी २३ टक्के दूध सहकार संघाकडे जमा राज्यात १५ ठिकाणी पशुखाद्य कारखाने सुरू करणारराज्यांच्या धर्तीवर थेट शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा होतील

अरूण बारसकरसोलापूर दि ३ : खासगी दूध संघावर कसलेही नियंत्रण नसल्याने दुधाचे दर त्यांच्या सोईने दिले जात असल्याचे आम्हाला दिसत असल्यानेच उसाच्या दरासाठी असलेला ७०:३० चा फॉर्म्युला दुधालाही लागू करण्यात येणार असून त्यासाठीचा कायदा येत्या हिवाळी अधिवेशनात मंजूर केला जाणार असल्याचे राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.राज्यात शासन अखत्यारित महानंदसह खासगी दूध संघांनी गाईच्या दूध खरेदीचा दर प्रति लिटर २१ रुपये केला आहे. शेतकºयांना परवडत नसले तरीही  दूध विकण्याशिवाय पर्याय नाही. शासनाने गाईच्या दुधाला खरेदी दर प्रति लिटर २७ रुपये जाहीर केला असला तरी तो महानंद व खासगी संघ मान्य नाही. या धर्तीवर राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शेतकºयांना परवडेल असे नाही तर फायदा होईल, अशा योजना पुढील वर्षात सुरू करणार असल्याचे सांगितले. देशाने मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारल्यानंतर  राज्यात सहकारी संघ अस्तित्वात असताना खासगी दूध संघ तालुक्यातालुक्यात निर्माण झाले. हे खासगी संघ सहकारी संघावर व विधानसभा, विधानपरिषदेत प्रतिनिधित्व करणाºयांचेच आहेत. खासगी संघावर राज्य शासनाचा अंकुश राहणार नाही, अशाच पद्धतीने कायदे केल्याने आज आम्ही दुधाला जाहीर केलेला दर देण्याचे खासगी संघ  मान्य करीत नाहीत. उसासाठी एफ.आर.पी. किंवा कारखान्याला मिळणाºया उत्पन्नापैकी ७० टक्के शेतकरी व ३० टक्के कारखाना व्यवस्थान खर्चासाठी असा कायदाच आहे. दुधाबाबत असा कायदा येत्या हिवाळी अधिवेशनात मांडणार असून कायदा मंजुरीनंतर साखर कारखान्याप्रमाणे सर्वच दूध संघांवरही शासनाचे नियंत्रण येईल, असे जानकर म्हणाले. आज राज्यातील शासकीय दूध डेअºया उद्ध्वस्त झाल्या असून गुजरातमधील अमूल व कर्नाटकमधील नंदिनी डेअरीपेक्षाही पुढे जाण्यासाठीची योजना महाराष्टÑातील दूध उत्पादकांसाठी सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.--------------------महिलांच्या नावेच पैसे जमा होतील- राज्यातील एकूण दुधापैकी २३ टक्के दूध सहकार संघाकडे जमा होते.- नवा कायदा मंजुरीनंतर संपूर्ण शेतकºयांची भावना सहकारी संघाला दूध घालण्याची होईल.- राज्यात १५ ठिकाणी पशुखाद्य कारखाने सुरू करणार असून आजच्या दराच्या २५ टक्के दरात शेतकºयांना पशुखाद्य मिळेल.- आरे शक्ती ब्रँड विकसित करून शेतकºयांसाठी महापूर योजना राबविणार असून अन्य राज्यांच्या धर्तीवर थेट शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा होतील.- या सर्व योजना राबवित असताना महिलांच्या नावावर बँकांत खाते उघडून महिलांच्या नावेच सर्व योजनांचे पैसे जमा करणार.