शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरमध्ये धाड घालून ५० हजार लिटर हातभट्टी दारू केली नष्ट

By admin | Updated: October 5, 2016 14:47 IST

राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने अवैध धंद्यावर धाड टाकून ५० हजार लिटर दारू नष्ट केली.

आप्पासाहेब पाटील, ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि.५ -  राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे सोलापूर तालुका पोलीस ठाणे व अन्य विभागाच्या मदतीने बुधवार ५ आॅक्टोबर रोजी मुळेगांव, बक्षीहिप्परगा (ता़द़सोलापूर) येथील अवैध धंद्यावर धाड टाकून २४९ बॅरेलमधील ५० हजार लिटर दारू तयार करण्यासाठीचे रसायन नष्ट करून १० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ ही कारवाई पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रमुख सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याची माहिती सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण भोसले व सहा़ पोलीस निरीक्षक विकास आडसुळ यांनी दिली़
दरम्यान, बुधवारी सकाळी राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांच्यासह अन्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांनी मुळेगांव तसेच बक्षीहिप्परगा तांड्यावर अचानक धाड टाकून दारू अड्डे उध्वस्त केले़ यात गुळ मिश्रित रसायन, प्लास्टिक टाक्या, बॅरेल असे साहित्यही नष्ट केले़ ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रमुख सागर धोमकर व पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण भोसले, सहा़ पोलीस निरीक्षक विकास आडसुळ, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी कोल्हे, पोलीस निरीक्षक पाटील यांच्यासह होमगार्ड, पोलीस कर्मचाºयांनी केली़ 
या कारवाई दरम्यान पोलिसांनी तीन जेसीपी यंत्रांच्या सहाय्याने हातभट्टी तयार करणारा गूळ, रसायन आणि इतर साहित्य ठेवलेले पिंप नष्ट केले. काही ठिकाणी जमिनीत व पिकांमध्ये तसेच विहिरीत दारूचा साठा दडवून ठेवण्यात आला होता याचाही शोध पोलीसांनी घेतला़ हातभट्टी दारू तयार करण्यासाठी महावितरण कंपनीच्या विद्युत तारांवर चक्क आकडे टाकून तर काही ठिकाणी बेकायदेशीर विद्युत जोडणी करून विजेचा वापर केला जात होता. महावितरणच्या पथकाने ही वीज जोडणी तोडून टाकल्याची माहिती समोर आली आहे़ शिवाय या हातभट्टी दारू निर्मिती कारखाने चालविणारे व त्यासाठी स्वत:च्या जागा उपलब्ध करून देणाºयांचा शोध घेऊन त्यांना अटक केली जाईल, असे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले. या कारवाईनंतर शहर व जिल्ह्यातील अवैध धंदे वाल्यांचे धाबे दणाणले आहेत़ मुळेगांव व बक्षीहिप्परगा तांड्यावर यापूवीर्ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली़