शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

आषाढी वारीत आतापर्यंत ५० कोटींची उलाढाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 12:18 IST

वारकºयांची खरेदी; प्रासादिक साहित्य, मूर्ती, उपवासाचे पदार्थ यांची विक्री

ठळक मुद्देभाविक पांडुरंगाचे दर्शन घेऊन गावी परत जाताना नक्कीच पांडुरंगाचा प्रसाद म्हणून काहीतरी खरेदी करतात़ पांडुरंगाचा प्रसाद म्हणून चुरमुरे, बत्ताशे, कुंकू, बुक्का, पांडुरंगाची मूर्ती किंवा फोटो, पेढा आदी साहित्य खरेदी करतात

पंढरपूर : आषाढी वारी सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून वारकरी येत असतात़ त्यादृष्टीने व्यापारीही नियोजन करतात.  आतापर्यंत विविध प्रासादिक साहित्य, मूर्ती, उपवासाचे पदार्थ, बॅगा यासह अन्य वस्तंमधून सुमारे ५० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यापाºयांनी व्यक्त केला.

पंढरपुरात प्रमुख चार वारीपैकी आषाढी मोठी वारी असल्याने विविध पालखी सोहळे, दिंड्यांमधून लाखोंच्या संख्येने भाविक येतात़ हे भाविक पांडुरंगाचे दर्शन घेऊन गावी परत जाताना नक्कीच पांडुरंगाचा प्रसाद म्हणून काहीतरी खरेदी करतात़ त्यामुळे विविध वस्तू आणि साहित्यांच्या विक्रीतून कोट्यवधींची उलाढाल अपेक्षित असते़ आषाढी वारी आली की महिनाभरापासून व्यापारी वर्गांची तयारी सुरू असते़ मंदिर परिसरातील व्यापारी वर्षभराची उलाढाल केवळ एका वारीतून होत असल्याचे गृहीत धरून नियोजन करतात.

देहू येथून संत तुकाराम महाराज आणि आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाल्यापासून किंवा त्यापूर्वीही पंढरीत भाविकांची रेलचेल सुरू असते़ भाविक पांडुरंगाचे दर्शन झाल्यानंतर घरी जाताना पांडुरंगाचा प्रसाद म्हणून चुरमुरे, बत्ताशे, कुंकू, बुक्का, पांडुरंगाची मूर्ती किंवा फोटो, पेढा आदी साहित्य खरेदी करतात.

स्थानिक व्यापाºयांबरोबरच बाहेरून येणाºया व्यापाºयांची संख्याही जास्त असते़ त्यामुळे मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे़ ढोबळ मानाने विचार केल्यास आतापर्यंत पंढरपुरात १० लाख वारकरी दाखल झाले आहेत़ त्यापैकी प्रत्येकाने किमान ५०० रुपये जरी खर्च केले असे गृहित धरले तरी ५० कोटींची उलाढाल झाल्याचे व्यापाºयांकडून सांगण्यात आले.

अशी झाली उलाढालआषाढी वारीत आतापर्यंत चुरमुरे १ कोटी ५० लाख, बत्ताशे ४० लाख, कुंकू, बुक्का, अष्टगंध यामधून ३० लाख, पेढा एक कोटी, मूर्ती व फोटोतून ५० लाख, अगरबत्ती २ कोटी, शाबुदाणा, शेंगदाणे, केळी, वेफर्ससह अन्य फळांमधून सुमारे २ कोटी ५० लाख, बॅगा ३ लाख यासह हॉटेल, लॉज, बॅगा, घोंगडी, संसारोपयोगी साहित्य, लहान मुलांसाठी खेळणी, टाळ, मृदंग, वीणा, पखवाज, पालखी यामधून ५० कोटींपर्यंत उलाढाल झाल्याचा अंदाज व्यापाºयांनी व्यक्त केला़ 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाMarketबाजार