शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

टँकरसाठी ४६ गावांचे प्रस्ताव! अक्कलकोट तालुका: स्वाक्षरीविना अडले घोडे

By admin | Updated: May 7, 2014 00:13 IST

अक्कलकोट: शिवानंद फुलारी

अक्कलकोट: दिवसेंदिवस उन्हाचा पारा चढू लागल्यामुळे तालुक्यातील जनतेला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यात वाड्यावस्त्यांसह एकूण १३६ गावे असून यापैकी ४६ गावे तहानलेली आहेत. या गावच्या ग्रामपंचायतींनी मासिक बैठकीत ठराव करुन टँकरसाठी प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. यावर तत्काळ निर्णय घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यापेक्षा अधिकार्‍याच्या स्वाक्षरीविना घोडे अडल्याची माहिती समोर आली आहे. मात्र यामुळे ग्रामीण भागातील जनतेला मात्र पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. गतवर्षीपेक्षा यंदा तालुक्यात पाऊस चांगला झाला तरी उन्हाची तीव्रताही वाढली आहे. तहानलेल्या गावांमधील पाण्याचे स्रोत कमी होऊ लागल्याने नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. प्रसंगावधान ओळखून ४६ गावातील सरपंच, ग्रामसेवकांनी मासिक बैठकीत ठराव करुन पंचायत समितीकडे टँकरसाठी मागणी केली आहे. त्यानुसार संबंधित विभागाचे उपअभियंता संजय धनशे˜ी, शाखा अभियंता निंबाळ, पं. स. चे अशोक झिंगाडे यांनी प्रत्यक्ष पाणीटंचाई असलेल्या गावांना भेटी देऊन तहसीलच्या संबंधित कार्यालयाकडे अहवाल दिला आहे. मात्र अद्याप यावर अधिकार्‍यांच्या स्वाक्षरीविना घोडे अडले असल्याची माहिती पंचायत समिती सूत्रांकडून मिळाली.गावांमधील विंधन विहिरी, पाणीपुरवठा विहिरींचे पाणी कमी झाल्यामुळे नागरिकांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे. गतवर्षी मे महिन्यात तालुक्यात १० टँकर सुरु होते तर २६ गावांमध्ये विहिरी अधिग्रहण करुन पाणीप्रश्न सोडविण्यात आला होता. पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये तातडीने टँकर पुरविले जावेत, अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे. तहानलेली गावेतालुक्यातील ४६ गावांमध्ये पाणीप्रश्न भेडसावत आहे. यामध्ये बिंजगेर, सदलापूर, दुधनी (ग्रामीण), बबलाद, परमानंदनगर, जेऊर, डोंबरजवळगे, गौडगाव (खु.), खैराट, घुंगरेगाव, वसंतराव नाईकनगर, मिरजगी, आंदेवाडी, बादोला (बु.), ब्यागेहळ्ळी, बणजगोळ, भोसणे लमाणतांडा, बोरी उमरगे, बोरोटी (खु.), चपळगाववाडी, चिक्केहळ्ळी, हालहळ्ळी (म.), हसापूर, हंजगी, इब्राहिमपूर, जेऊरवाडी, कलहिप्परगा, कंठेहळ्ळी, समतानगर, केगाव (बु.), किरनळ्ळी, कोन्हाळी, नागूर, नाविंदगी, निमगाव, शिरसी, बादोले (खु.), तळेवाड, बोरगाव (दे.), दहिटणे-फैलवाडी, गुड्डेवाडी, किणीवाडी, पितापूर, गावठाण, साफळा, सुलतानपूर, संगोगी (म.) आदी तब्बल ४७ गावे तहानलेली आहेत. काही गावांना टँकरची गरज आहे. काही गावात विहीर अधिग्रहण, विहीर दुरुस्ती आदी प्रस्ताव तहसील कार्यालयात पडून आहेत. ---------------------------दृष्टिक्षेपएकूण गावे: १३६लोकसंख्या: २,९०,०३२टँकरची मागणी : १३एकाही गावात टँकर चालू नाहीतहानलेली गावे: ४६पाण्याचे स्रोत: दूरवरून शेतकर्‍यांच्या विहिरीतून पाण्यासाठी भटकंती--------------------------तालुक्यातील ४६ गावांनी केलेल्या मागणीप्रमाणे टँकर मागणीचे प्रस्ताव घेऊन पाणीटंचाईच्या निवारणार्थ मंजुरी मिळविण्यासाठी अक्कलकोट तहसीलकडे पाठविले आहेत. लवकरच त्यावर निर्णय होऊन कार्यवाही होईल.- संजय धनशे˜ी, उपअभियंता (प्र.) ग्रामीण पाणीपुरवठा, अक्कलकोट