शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सांगोला शहर तालुक्यात ३०१ ॲक्टिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:21 IST

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी गेल्या वर्षभरात सांगोला तालुक्यातील ५५ हजार २२७ जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यात ३ हजार ६११ ...

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी गेल्या वर्षभरात सांगोला तालुक्यातील ५५ हजार २२७ जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यात ३ हजार ६११ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांपैकी ६६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३२४४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सिंहगड कोविड सेंटरमध्ये ७४ कोरोनाबाधित रुग्णांना दाखल केले आहे. तर १६६ जण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत.

सध्या तालुक्‍यातील रुग्णांची वाढती संख्या पाहता भविष्यात आणखी कोरोना केअर सेंटरची गरज भासणार आहे. गतवर्षी एप्रिल महिन्यात असलेल्या रुग्णसंख्येपेक्षा या वर्षी तालुक्‍यात कोरोना रुग्णांची संख्या अधिक दिसत आहे. मृत्युदरही अधिक असल्यामुळे सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी स्वतःची व कुटुंबाची काळजी घेण्यासाठी तोंडाला मास्क लावणे, गरज असेल तरच घराबाहेर पडणे, सोशल डिस्टन्सिंगचे अंतर ठेवणे, स्वतःला कोरोनापासून दूर ठेवणे अशी काळजी घेतली तरच आपण कोरोनापासून मुक्त होणार आहोत अन्यथा सर्वांनाच गंभीर परिस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे.

रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्ण सापडलेल्या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र तयार करणे, रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या टेस्ट करणे, यावर प्रशासनाकडून भर दिला जात आहे. तालुक्यातील महूद, यलमार मंगेवाडी, मांजरी, कडलास, गायगव्हाण, वाटंबरे या गावात रुग्णसंख्या वाढल्याने त्या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र घोषित केल्याचे तहसीलदार अभिजित पाटील यांनी सांगितले.