शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

सोलापुरात मिरवणुकीमध्ये नाचताना ३ तरुणांना मारहाण; रुग्णालयात उपचार सुरू

By रवींद्र देशमुख | Updated: June 6, 2023 17:14 IST

हिपळे येथील घटना, नुकतीच अहिल्यादेवी होळकर यांची जयंती शहर जिल्ह्यात साजरी करण्यात आली. सोमवारी रात्री हिपळे गावात जयंती उत्सवानिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती.

सोलापूर : राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सव मिरवणुकीत नाचणाऱ्या तिघा तरुणांना दोघांनी मिळून बेदम मारहाण केली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील हिपळे गावात सोमवारी रात्री ९:३० च्या सुमारास ही घटना घडली.

वीरेंद्र प्रतापसिंह दोडताले (वय ३२), बादशाह मोहम्मद शेख (वय २३) व अशोक पिरप्पा गायकवाड (वय २१, सर्व. रा. हिपळे, ता. द. सोलापूर) अशी मारहाण झालेल्या तरुणांची नावे आहेत.

नुकतीच अहिल्यादेवी होळकर यांची जयंती शहर जिल्ह्यात साजरी करण्यात आली. सोमवारी रात्री हिपळे गावात जयंती उत्सवानिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत वीरेंद्र, बादशहा व अशोक हे सहभागी झाले होते. मिरवणुकीत नाचत असताना त्यांना राजू प्रल्हाद वाघमोडे व सूरज राजू वाघमोडे यांनी विनाकारण मारहाण केली. यात त्याच्या हाताला व छातीला मार लागून वीरेंद्र जखमी झाला. बादशहा याच्या डाव्या हाताला तर पाठीला आणि पोटाला मार लागून अशोक जखमी झाला. जखमी अवस्थेत तिघांना मित्र धर्मराज यांनी सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तिघांनाही शासकीय रुग्णालयात उपचारास दाखल केले. या घटनेची सिव्हिल पोलिस चौकीत नोंद झाली आहे.