शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

बार्टीकडून बक्षिसाचे २५ .९० लाख हडप, सोलापूरातील प्रकार, विजेते बक्षीसाच्या प्रतिक्षेत

By admin | Updated: July 15, 2017 11:17 IST

-

- बाळासाहेब बोचरेसोलापूर दि १५ : कार्यशाळेच्या नावाखाली बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) सोलापूर जिल्ह्यात दोन लाखांचा घोटाळा केल्याची बाब समोर आली असताना बार्टीने २००६ साली आयोजित केलेल्या विविध स्पर्धेतील बक्षिसाची २५ लाख ९० हजार रुपये रक्कम खर्ची टाकली असून या घटनेला १० वर्षे उलटली तरी अद्याप बक्षीस विजेत्यांना ती मिळाली नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बार्टीने शासनाला दोन लाखांचा गंडा घातल्याचे वृत्त लोकमतमध्ये दि. ११ जुलैच्या अंकात प्रसिद्ध होताच सोलापुरातील सागर उबाळे यांनी ‘लोकमत’शी संपर्क साधून बार्र्टीने २५ लाख ९० हजार रुपये कसे हडप केले याचे माहिती अधिकारात गोळा केलेले पुरावे सादर केले. बार्टीच्या वतीने एप्रिल २००६ मध्ये फुले, शाहू, आंबेडकर या विषयावर निबंध, पाठांतर, प्रश्नावली, वादविवाद, वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या होत्या. राज्यातील १६४ केंद्रांवर या स्पर्धा घेण्यात आल्या असून, त्यासाठी एकूण २५ लाख ९० हजार ६०० रुपयांची एकूण बक्षिसे ठेवण्यात आली होती. यासाठी राज्याच्या समाजकल्याण विभागामार्फत २६ लाखांचा निधी दिला असताना ही रक्कम अद्याप एकाही बक्षीस विजेत्यास मिळालेली नाही. या स्पर्धेनंतर बार्टीकडून सर्व विजेत्यांना केवळ कोरी प्रमाणपत्रे संबंधित जिल्ह्णांना पाठवण्यात आली. रकमेबाबत विजेते पाठपुरावा करत राहिले पण बार्टीकडून टोलवाटोलवी झाली. त्यानंतर सागर उबाळे यांनी बार्टीकडे माहिती अधिकारात स्पर्धेच्या रकमेबाबत विचारणा केली असता सदर रक्कम यशदाकडे सुपूर्द केल्याची माहिती देण्यात आली. दि. १८ मार्च २००६ म्हणजे स्पर्धा घेण्यापूर्वीच यशदाकडे स्पर्धेची रक्कम धनादेशाद्वारे सुपूर्द केल्याचे दि. २५ जून २००७ रोजी एका पत्राद्वारे उबाळे यांना कळवण्यात आले. तथापि अद्याप यशदाकडून अशी रक्कम वाटण्यात आली नाही. त्यानंतर यशदाकडे माहिती अधिकारात याबाबत माहिती मागितली असता यशदाने प्रथम केवळ २९ रुपये मागणी केली. अर्जदाराने २९ रुपयांची मनिआॅर्डर यशदाच्या नावे केली असता लवकरच माहिती पाठवली जाईल असे २८ आॅगस्ट २००७ रोजी पत्राद्वारे कळवण्यात आले. तथापि अद्याप अर्जदाराला माहिती देण्यात आली नाही किंवा बक्षिसाची रक्कम देण्यात आलेली नाही. उलट सागर उबाळे हे शासकीय कर्मचारी असल्याने त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. अलीकडेच जुलै २०१६ व जून २०१७ मध्ये उबाळे यांनी मुख्यमंत्री, समाजकल्याण मंत्री व पुणे विभागीय आयुक्त यांंना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे.