शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

२,४५२ शेतकऱ्यांचे शेततळ्याचे १२ कोटी १ लाखांचे अनुदान रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:21 IST

सांगोला : तत्कालीन सरकारने शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेतून सोलापूर जिल्ह्यातील १२ हजार ४७० शेतकऱ्यांना शेततळ्यांचा लाभ मिळाला. ...

सांगोला : तत्कालीन सरकारने शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेतून सोलापूर जिल्ह्यातील १२ हजार ४७० शेतकऱ्यांना शेततळ्यांचा लाभ मिळाला. परंतु शासनाकडून शेततळ्यासाठी मिळणारे अनुदान बंद झाले आहे. दोन वर्षात जिल्ह्यातील २ हजार ४५२ शेतकऱ्यांचे सुमारे १२ कोटी १ लाख २४८ हजार रुपयांचे अनुदान शासनाकडे प्रलंबित राहिले आहे. त्यामुळे लाभार्थी अनेक आर्थिक अडचणींचा सामना करीत आहे.

सन २०१६ -१७ ते २०१९-२० आणि २०२०-२१ या काळात शासनाने राबविलेल्या मागेल त्याला शेततळे या योजनेला सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यासाठी ८ हजार शेततळ्यांचा उद्दिष्ट असताना १२ हजार ४७० शेतकऱ्यांनी शेततळी पूर्ण केली. शासनाने ४५ कोटी ७९ लाख ११ हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना वितरित केले. मात्र, गेल्या दोन वर्षांत उर्वरित अनुदान शासनाकडे प्रलंबित राहिले आहे.

या योजनेतून सोलापूर जिल्ह्यात केलेल्या २ हजार ४५२ शेततळ्यांचे ११ कोटी १ लाख ४८ हजार रुपयांचे अनुदान शासनाकडे प्रलंबित आहे. मागील मार्चपासून या योजनेअंतर्गत अर्ज मागविण्याची प्रक्रियाही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. पूर्वीच्या लाभार्थ्यांना अनुदान मिळत नाही अन नवीन शेतकऱ्यांना शेततळे मिळत नाही, अशा दुहेरी संकटात जिल्ह्यातील शेतकरी सापडला आहे.

---

लाभार्थी अन तालुके

दक्षिण सोलापूर तालुक्‍यात १०७ शेतकऱ्यांचे ४७ लाख ५३ हजार, मोहोळ तालुक्‍यात ३१० शेतकऱ्यांचे १ कोटी ५१ लाख ९० हजार, अक्कलकोट तालुक्यात १०० शेतकऱ्यांचे ४९ लाख, बार्शी तालुक्‍यात १२२ शेतकऱ्यांचे ५९ लाख ७८ हजार, माढा तालुक्‍यात ५२४ शेतकऱ्यांचे २ कोटी ५६ लाख ७६ हजार, करमाळा तालुक्‍यात ७९ शेतकऱ्यांचे ३८ लाख ७१ हजार, पंढरपूर तालुक्‍यात ४६९ शेतकऱ्यांचे २ कोटी २९ लाख ८१ हजार, सांगोला तालुक्‍यात ३८९ शेतकऱ्यांचे १ कोटी ९० लाख ८१ हजार, मंगळवेढा तालुक्‍यात १६० शेतकऱ्यांचे ७८ लाख ४० हजार, माळशिरस तालुक्‍यात २०२ शेतकऱ्यांचे ९८ लाख ९८ हजार अशा एकूण २ हजार ४५२ शेतकऱ्यांचे १२ कोटी १ लाख ४९८ हजार रुपयांचे अनुदान राज्य सरकारकडे प्रलंबित आहे.