शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

 २४ तीर्थंकारांचे विचार, परंपरा, संस्कृती तरूणाईत रुजवा :  राजेंद्र भारुड, जैन कासार विकास प्रतिष्ठानच्या पुरस्कारांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 15:00 IST

सोलापूर दि २१ :  कोणत्याही पदावर राहा, सर्वसामान्यांसाठी पदाच्या माध्यमातून काय करता येईल ते पाहा़ देश आपल्यासाठी काय करतोय यापेक्षा देशासाठी आपण काय करु शकतो ते पाहा़ हिमालयाच्या शिखरावर जरुर पोहोचा, परंतु मनातील विनम्रता विसरु नका़ जगाला वाचवायचे असेल तर २४ तीर्थंकारांचे विचार, परंपरा, संस्कृती तरुणाईमध्ये रुजवा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी केले़

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २१ :  कोणत्याही पदावर राहा, सर्वसामान्यांसाठी पदाच्या माध्यमातून काय करता येईल ते पाहा़ देश आपल्यासाठी काय करतोय यापेक्षा देशासाठी आपण काय करु शकतो ते पाहा़ हिमालयाच्या शिखरावर जरुर पोहोचा, परंतु मनातील विनम्रता विसरु नका़ जगाला वाचवायचे असेल तर २४ तीर्थंकारांचे विचार, परंपरा, संस्कृती तरुणाईमध्ये रुजवा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी केले़ जैन कासार विकास प्रतिष्ठानचा पुरस्कार वितरण समारंभ आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार  सोहळा रविवारी सायंकाळी शिवस्मारक सभागृहात पार पडला, याप्रसंगी ते बोलत होते़  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘लोकमत’चे संपादक राजा माने होते़ यावेळी व्यासपीठावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय कंदले आणि पुरस्कारमूर्ती उपस्थित होते़ प्रास्ताविक  संजय कंदले यांनी केले़ यावेळी दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके  देऊन गौरविण्यात आले़ डॉ़ भारुड यांनी प्रारंभी मनोगतातून हिमालयाच्या शिखरावर जरुर पोहोचा, परंतु मनातील विनम्रता विसरु नका, आपल्या समाजाकडे कोण कसं पाहतोय याचा विचार करा असे ते म्हणाले़ संपूर्ण जगात जैन समाजबांधवांची संख्या ही ७० लाखांवर आहे़ १२० क ोटींच्या या देशात केवळ ४४ लाख आहे़ तरीदेखील देशात सर्वाधिक कर भरणारा जैन समाज आहे़ स्वत:च्या आयुष्यातील संघर्ष सांगत त्यांनी मांसाहार, चहा-कॉफी आणि कांदा-लसूणही सोडल्याचे म्हणाले़ लोकमतचे संपादक राजा माने यांनी अध्यक्षीय मनोगतात डॉ़ भारुड यांच्यासारखे आयएएस अधिकारी ही देशाची संपत्ती आहे, ती सामाजिक संस्थांनी जपली पाहिजे म्हणाले़ सूत्रसंचालन जिवराज खोबरे यांनी केले तर हुकू मचंद हेसे यांनी आभार मानले़ यावेळी डॉ़ विलास हरपाळे, प्रतिष्ठानचे सचिव महावीर दुरुगकर, कांतीलाल नळे, विनायक टोणगे, बाबुराव तंगा, माणिक व्यवहारे, शाम पाटील, विलास कंदले, सुभाषचंद्र वनकुद्रे, डॉ़ मधुकर लोखंडे, प्रा़ सुनीता इंदापुरे-तंगा, सीमा विभुते, स्रेहलता नळे आदी उपस्थित होते़ ------------------------पुरस्कारमूर्तींचा गौरव़़़च् विनोदिनी विभुते (स्व़ कुसुमताई तंगा आदर्श माता पुरस्कार)च् मतिसागर भाऊराव पाटील (जैन कासार जीवनगौरव पुरस्कार)च् शशिकांत मोहरे, अनिल जमगे, अमोल जगधने (स्व़ मधुकर कंदले   उद्योगरत्न पुरस्कार)