शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात 21 लाखांची रोकड जप्त

By admin | Updated: January 18, 2017 14:39 IST

सोलापूर महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची देवाण-घेवाण व पैशांचा पुरवठा होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी वाहन तपासणी सुरू ठेवली आहे.

 ऑनलाइन लोकमत

सोलापूर, दि. 18 - सोलापूर महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची देवाण-घेवाण व पैशांचा पुरवठा होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी वाहन तपासणी सुरू ठेवली आहे. याच नाकाबंदी दरम्यान तुळजापूर नाक्याहून स्थिर सर्वेक्षण पथकाने 21 लाख 44 हजार रुपयांची रोकड जप्त केली. 
 
निवडणूक आयोगाने महानगर पालिका निवडणुकीत वाहनांची तपासणी करण्यावर भर दिला आहे. यासाठी निवडणूक आयोगाने  पोलीस यंत्रणेला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. मिथेनॉलमिश्रित दारूची तस्करी होण्याची शक्यता आहे. तसेच शस्त्रांची व पैशांची तस्करी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहराती विविध भागात  चेक नाके उभारण्यात आले आहेत.
 
तुळजापूर नाका येथे सर्वेक्षण पथकाने एमएच 13 बीएन 1488 या कारमधुन तब्बल 21 लाख 44 हजार रुपयांची रोकड जप्त केली. या प्रकरणी एकास ताब्यात घेतले आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे एका व्यापा-याला हरभरा विक्री करुन रक्कम सोलापूरला आणल्याचे ताब्यात घेतलेल्या इसमाने अशी माहिती पोलिसांना दिली. जप्त रक्कमेमध्ये 2000 व 500 रुपयांच्या नवीन नोटांचा समावेश आहे. 
 
ही कारवाई जोडभावी पेठ पोलीस ठाण्यांचे पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण राठोड, हवालदार आवचारे, पोकॉ. केदार, माने, मुजावर आदींनी ही कामगिरी केली.
 
शहरात स्थिर सर्वेक्षण पथक  विविध भागात 24 तास फिरत आहेत. परजिल्ह्यातील तसेच आपल्या जिल्ह्यातील संशयास्पद वाहन दिसले तर थांबविले जात आहे. वाहनाची झडती घेण्याबरोबर कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. - सूर्यकात पाटील, गुन्हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक 
 
या ठिकाणी आहे सुरू नाकाबंदी 
शहरात आठ ठिकाणी चेक पोस्ट शहरातील जुना पुना नाका, बाळे नाका, तुळजापूर नाका, हैद्राबाद रोड, देगाव नाका, नवीन हैद्राराबाद नाका, होटगी  व विजापूर नाका या आठ ठिकाणी महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चेक पोस्ट उभारले आहेत.