शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
4
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
7
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
8
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
12
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
13
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
14
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
15
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
16
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
17
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
18
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
19
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
20
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी

कर्नाटकात जाणारा २०० पोती युरिया जप्त

By admin | Updated: September 19, 2014 23:34 IST

कृषी विभागाची कारवाई : आठवड्यात तीन ट्रक खत कर्नाटकात

सांगली : जिल्ह्याच्या वाट्याचे दोनशे पोती युरिया आणि ८० किलो १८:१८:१८ विद्राव्य खत एका मुख्य खत विक्रेत्याच्या माध्यमातून कर्नाटकात घेऊन जाणारा ट्रक (क्र. एमएच ४३/ई५८९६) जिल्हा परिषद कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी खटाव (ता. मिरज) येथे पकडला. यातील सर्व खत कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील गोदामामध्ये ठेवले असून, विक्री बंदचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, मागील आठवड्यात तीन ट्रक खत कर्नाटकामध्ये गेल्याची कबुलीही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुख्य विक्रेत्यांच्या खताच्या काळ्याबाजारामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना युरिया, डीएपी खताच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कडक कारवाई करण्याची गरज आहे.(एमएच ४३/ई५८९६) या क्रमांकाच्या ट्रकमध्ये चालकाने सांगलीतील रेल्वेस्थानकावरून दोनशे पोती युरिया व ८० किलो १८:१८:१८ विद्राव्य खत भरले होते. या ट्रक चालकाकडे खटाव येथील न्यू सोमेश्वर कृषी सेवा केंद्रासाठी खत देण्याचे बिल होते. खटावमध्ये ट्रक गेल्यानंतर सोमेश्वर कृषी सेवा केंद्राच्या मालकांनी संबंधित खत आमचे नसल्याचे सांगितले. तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कल्पना दिली. यावेळी कृषी विकास अधिकारी आर. जे. भोसले यांनी संबंधित कृषी सेवा केंद्रचालकास ट्रक तेथेच थांबवून ठेवण्याची सूचना दिली. त्यानंतर संबंधित ट्रकचालकाची आणि खताची तपासणी कृषी विकास अधिकारी भोसले, जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी डी. एस. शिंगे, ए. ए. बारवकर आदींनी केली. यावेळी संबंधित खत कर्नाटकात जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने ते खत कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील एका गोदामात ठेवण्यात आले. या सर्व खताला विक्री बंदचे आदेश देण्यात आले आहेत.दरम्यान, कृषी विकास अधिकारी भोसले म्हणाले की, या कृषी सेवा केंद्राचे बोगस बिल करून दहा टन खत घेऊन खटाव येथे ट्रक गेला होता. प्रत्यक्षात हेही खत कर्नाटकातच जात असण्याची शक्यता आहे. म्हणून संबंधित खत पाठविणारे मुख्य विक्रेते वरद कृषी सेवा केंद्र येथील व्यवस्थापकांचा जबाब घेतला जात आहे. मागील आठवड्यात याच पध्दतीने दोन ते तीन ट्रक खत कर्नाटकात गेले असण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक सीमाभागात कशा पध्दतीने खत जात आहे, याची तपासणी केली जात आहे. (प्रतिनिधी)