शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

दुकानासाठी २ लाख अन् मुलगा म्हणून वारस न दिल्यानं पतीने दिली पत्नीला घटस्फोटाची धमकी

By शीतलकुमार कांबळे | Updated: August 25, 2023 18:55 IST

फिर्यादीच्या आईस सांगलीला बोलावून घेऊन तिचा अपमान करून शिवीगाळ, दमदाटी करून हाकलून दिले.

सोलापूर - इलेक्ट्रिक दुकानासाठी दोन लाख रूपये आई-वडिलांकडून घेऊन ये नाहीतर घटस्फोट देईन अशी धमकी पतीने पत्नीला दिली. याबाबतची तक्रार बुधवार पेठेतील विवाहित महिलेने पोलिसात दिली असून याप्रकरणी सांगलीच्या सहा जणांविरोधात फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पती सागर बिनवडे, सासू मंगल बिनवडे, सासरे प्रकाश बिनवडे, नणंद रूपाली गोर्हे, दिपाली शिके (रा. लक्ष्मी नगर, जुना बुधगाव रोड, सांगली) असे गुन्हा दाखल झालेल्या सहा जणांची नावे आहेत. याबाबत सुप्रिया सागर बिनवडे (वय २२, रा. जय मल्हार चौक, साठे चाळ, बुधवार पेठ, सोलापूर यानी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादीस तु आमचे ऐकत नाही, तू आमच्या वंशाला वारस म्हणून मुलगा दिला नाही तसेच इलेक्ट्रिक दुकानाकरिता २ लाख रूपये आई-वडिलांकडून घेवून ये नाहीतर घटस्फोट दे म्हणत पती सागर याने धमकी दिली.

याचवेळी फिर्यादीच्या आईस सांगलीला बोलावून घेऊन तिचा अपमान करून शिवीगाळ, दमदाटी करून हाकलून दिले. त्यानंतर फिर्यादी तिची मुलगी शालिनी (वय ४) हिच्यासह माहेरी सोलापूर येथे राहण्यास आली असून तेव्हापासून फिर्यादी हिस वारंवार संपर्क करून नांदविण्यास घेवून जाणयाकरिता विनंती केली, परंतू जोपर्यंत २ लाख रूपये घेवून येत नाही तोपर्यंत तू आमच्याकडे नांदण्यास यायचे नाही असे म्हणून फिर्यादीस सासरी घेवून जाण्यास नकार दिला. याप्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पवार हे करीत आहेत.