शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

रांझणीत २ लाखांची देशी दारू जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:16 IST

रांझणी (ता. पंढरपूर) येथील आवताडे वस्तीजवळ एक इसम अवैधरीत्या देशी दारू विकत असल्याची बातमी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम ...

रांझणी (ता. पंढरपूर) येथील आवताडे वस्तीजवळ एक इसम अवैधरीत्या देशी दारू विकत असल्याची बातमी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलिसांचे पथक रांझणीत पाठवले. यावेळी प्रदीप बाळासाहेब आवताडे हा अवैधरीत्या देशी दारू विक्री करताना मिळून आला. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने घराजवळ ठेवलेला अवैध दारूसाठा दाखविला. हा दारूसाठा नागेश प्रकाश ढोले याच्या वाहनातून आणल्याचे सांगितले.

या कारवाईत देशी दारु १८० मि.ली.च्या एकूण ३३६० बॉटल (७० बॉक्स) असा २ लाख १ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी प्रदीप बाळासाहेब आवताडे, नागेश प्रकाश ढोले (रा. रांझणी, ता. पंढरपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उप.पो.नि. हमीद शेख, पोना नीलेश रोंगे, पोकॉ लोंढे, पोकॉ शिवशंकर हुलजंती यांनी केली.

----