शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

वाळू उपशाने तेलगावात उडाला भडका मोडतोड, सरपंचासह १८ जणांवर गुन्हा

By admin | Updated: May 7, 2014 00:07 IST

दक्षिण सोलापूर : वाळू उपशाला तेलगाव ग्रामस्थांनी विरोध केल्यानंतरही महसूल प्रशासनाने ठेकेदाराला पोलीस बंदोबस्तात वाळू साठ्याचा ताबा दिला आणि तेलगावामध्ये पुन्हा एकदा संघर्षाचा भडका उडाला. तोडफोडीसाठी गाव नदीपात्रात उतरले. मारहाणप्रकरणी सरपंचासह १८ जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

दक्षिण सोलापूर : वाळू उपशाला तेलगाव ग्रामस्थांनी विरोध केल्यानंतरही महसूल प्रशासनाने ठेकेदाराला पोलीस बंदोबस्तात वाळू साठ्याचा ताबा दिला आणि तेलगावामध्ये पुन्हा एकदा संघर्षाचा भडका उडाला. तोडफोडीसाठी गाव नदीपात्रात उतरले. मारहाणप्रकरणी सरपंचासह १८ जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.वाळू वाहतुकीमुळे रस्ता खराब होत असल्याची तेलगाव ग्रामस्थांची तक्रार होती. त्यामुळे लिलावाला विरोध दर्शविण्यासाठी उपोषणाचे हत्यार उपसले होते. चार दिवसांच्या उपोषणानंतर जिल्हाधिकार्‍यांनी रस्ते दुरुस्तीचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले होते.शनिवारी तहसीलदारांनी ठेकेदाराला तेलगाव साठ्याचा ताबा दिला आणि संघर्षाची ठिणगी पडली. ग्रामस्थांनी नदीपात्रात धाव घेतली आणि वाळू उपसा करणारी बोट नष्ट केली, पत्रा शेड तोडले, याकामी महिलाही रस्त्याावर उतरल्या. गावात गेल्या दोन दिवसात प्रचंड तणाव होता.सोमवारी ग्रामस्थ आणि वाळू ठेकेदारांची माणसे समोरासमोर आली. अनिल भीमराव घाडगे (वय ४३, रा. कल्याणनगर भाग - १) यांच्यावर तलवार, हंटर आणि कुर्‍हाडीने हल्ला केल्याची फिर्याद मंद्रुप पोलीस ठाण्यात करण्यात आली.याप्रकरणी सरपंच श्रीशैल पाटील, भाजपचे सरचिटणीस विजयकुमार बिराजदार, श्रीकांत चलवदे, भीमाशंकर बिराजदार, आमसिद्ध कोळी, शरणप्पा कोळी, आप्पासाहेब बिराजदार, सुरेश पाटील, महादेव कोळी, राजू राजमाने, रामा माशाळे, लगमण्णा कोळी, मल्लिकार्जुन पाटील, रुपेश बिराजदार, लक्ष्मण धोंडप्पा पुजारी, सुरेश कोळी, चंद्रकांत पाटील, सिद्धार्थ कांबळे (वडापूर) या १८ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादीत सरपंच श्रीशैल पाटील आणि त्यांच्या सहकार्‍यांनी तुम्ही वाळू उपसा करायचा नाही. वाळू उपसा करणार असाल तर आम्हाला हप्ता द्या, असा दम भरल्याचे अनिल घाडगे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.