शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

आंबे गावात प्रसादातून विषबाधा १७० जण रुग्णालयात दाखल: दोघे गंभीर

By admin | Updated: May 7, 2014 22:45 IST

०७पंड०२,०३

चळे : आंबे (ता. पंढरपूर) येथील दर्लिंग देवाच्या वालगानिमित्त (धार्मिक भोजन) दिलेल्या प्रसादातून १७० जणांना विषबाधा झाली. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. ११८ रुग्णांना पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात, दोघांना पंढरपुरातील खासगी तर ५० जणांना आंबे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णांमध्ये लहान मुले, महिला, वृद्ध नागरिकांचा समावेश आहे.आंबे येथील राजाराम विठोबा पुजारी यांनी सोमवारी (५ मे) दर्लिंग देवाच्या वालगाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी गावातील ग्रामस्थांना प्रसादाचे वाटप करण्यात आले होते. वालगानिमित्त महाप्रसादामध्ये बुंदीचे लाडू, पुरी, भात, भाजी व मठ्ठा या पदार्थांचा समावेश होता. सोमवारी सायंकाळपर्यंत जेवण केलेल्या लोकांना मध्यरात्रीनंतर मळमळ, डोकेदुखी, उलटी, जुलाब आदी त्रास जाणवू लागला; मात्र उन्हाच्या त्रासामुळे हा प्रकार घडला असल्याचे समजून लोकांनी गावातील डॉक्टरांकडे किरकोळ उपचार घेतले. गावातील डॉक्टरांकडे अशा प्रकारच्या रुग्णांची संख्या वाढल्याने त्यांनी भोजनातून विषबाधा झाल्याची शक्यता वर्तवून डॉ. प्रसाद अंकुशराव, डॉ. श्रीकृष्ण शिंदे, डॉ. विशांत पाटील यांच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार करून रुग्णांना पुढील उपचारासाठी पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालय व खासगी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले.नागरिकांचे सहकार्यआंबे ग्रामस्थांना विषबाधा होऊन त्रास होऊ लागल्यानंतर सरपंच भारत गायकवाड, आण्णा शिंदे, सचिन पाटील, अरुण शिंदे, तानाजी सावंत, नागनाथ सावंत, अर्जुन कोळी, संभाजी शिंदे या ग्रामस्थांनी खासगी वाहनातून रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. शासनाच्या व खासगी रुग्णालयाच्या रुग्णवाहिकांमधून रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.काय आहे वालगा?पंढरपूर तालुक्यातील चळे, आंबे व तारापूर येथे दर्लिंग देवाची मंदिरे असून चैत्र शु. पौर्णिमेला या ठिकाणी यात्रा होतात. यात्रेनंतर आपापल्या कुवतीनुसार परिसरातील भाविक या देवांच्या पालख्या आपल्या घरी बोलावून त्यांचे मानकरी व पुजार्‍यांसह नातेवाईक, ग्रामस्थांना गोड जेवण देतात. या जेवणातूनच विषबाधा झाली असल्याचे सिद्ध झाले आहे.आंबे गावात भीतीवालगानिमित्त देण्यात येणार्‍या भोजनासाठी गावातील प्रत्येक घरातून माणूस निमंत्रित करण्यात येतो. सोमवारी राजाराम पुजारी यांच्या घरी झालेल्या वालगासाठी गावातील प्रत्येक घरातील माणूस जेवल्याने त्या सर्वांनाच त्रास होत असून, या घटनेमुळे गावात भीती पसरली आहे. ग्रामस्थ व नातेवाईकांना घटना समजल्यानंतर पंढरपूरकडे धाव घेतली.