शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

यंत्रमाग कामगारांच्या मजुरीत १५ टक्के वाढ

By admin | Updated: May 23, 2014 00:52 IST

कामगारांचा तिढा सुटला : अपर कामगार आयुक्तांनी केली तडजोड

सोलापूर : शहरातील यंत्रमाग कामगारांच्या मजुरीत १५ टक्के तर याच्याशी निगडित असलेल्या कामगारांना १३ टक्के वाढ देण्याचा निर्णय यंत्रमाग कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या बैठकीत अपर कामगार आयुक्त हेंद्रे यांनी जाहीर केला. त्यामुळे कामगारांच्या मजुरीवाढीचा प्रश्न अखेर सुटला आहे. शहरातील यंत्रमाग कामगारांच्या वाढ मजुरीची मुदत दि. ३१ मार्च २०१४ रोजी संपलेली आहे. त्यामुळे यंत्रमाग धंद्यामध्ये काम करणार्‍या सिटू, मनसे, सेना, जयहिंद कामगार संघटना व भारतीय कामगार संघटना यांनी सहायक कामगार आयुक्त यांच्याकडे वाढ मजुरीच्या संदर्भात प्रस्ताव दाखल केला होता. दरम्यानच्या काळात आचारसंहिता लागू झाल्यामुळे वाढ मजुरीसंदर्भात निर्णय होऊ शकला नव्हता. त्यामुळे अपर कामगार आयुक्त हेंद्रे यांनी गुरुवारी दुपारी २ वा. शासकीय विश्रामगृहात यंत्रमागधारक संघटना व यंत्रमागधंद्यात काम करणार्‍या सर्व ट्रेड युनियनची संयुक्त बैठक बोलावली होती. या बैठकीस प्रभारी सहायक कामगार आयुक्त मुजावर, यंत्रमागधारक संघटनेच्या वतीने पेंटप्पा गड्डम, राजगोपाल झंवर, जगदीश खंडेलवाल, राजू राठी, अंबादास बिंगी, संघटनेतर्फे माजी आमदार नरसय्या आडम, व्यंकटेश कोंगारी, प्रभाकर तेलंग, सूर्यकांत केंदळे, बाबू कोकणे, शहाबुद्दीन शेख, लक्ष्मण माळी आदी उपस्थित होते. बैठकीत सर्व संघटनेच्या वतीने १७.५ टक्के मजुरी वाढ देण्याची मागणी केली होती. मात्र यंत्रमाग मालक संघटनेच्या वतीने १0 टक्के वाढ देण्याचे सुचविले होते. दोन्ही बाजूच्या मागणीचा विचार करून अपर कामगार आयुक्त हेंद्रे यांनी तडजोड करून सर्व यंत्रमाग कामगारांना विव्हरसाठी (लूम कामगार) १00 कार्डास १५ टक्के व बँक प्रोसेसमध्ये काम करणार्‍या सर्व कर्मचार्‍यांना त्यांच्या पगारामध्ये १३ टक्के वाढ देण्याचा निर्णय जाहीर केला. दि. १ एप्रिल २0१४ पासूनच्या फरकासहित वाढ मजुरी देण्याचा निर्णय झाला आहे.

-------------------------

कामगार एकजुटीची गरज... भविष्यकाळात किमान वेतन व स्पेशल अलाउन्ससह यंत्रमाग कामगारांना सर्व कामगार कायदे लागू करून घेण्यासाठी कामगार एकजुटीची गरज आहे, असे आवाहन यावेळी माजी आमदार नरसय्या आडम यांनी केले. -----------------------------------

शासकीय विश्रामगृह येथे बोलावण्यात आलेल्या या बैठकीस गांधी नगर, एमआयडीसी भागातील कामगार अर्धी सुट्टी घेऊन आले होते, त्यामुळे थोडावेळ तणावाचे वातावरण निर्माण होऊन प्रचंड घोषणाबाजी झाली. अखेर अपर कामगार आयुक्तांनी ताबडतोब निर्णय जाहीर केल्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

--------------------------------------

यंत्रमाग मालक संघटनेच्या वतीने १0 टक्के मजुरी वाढ देण्याची तयारी दर्शविली होती. आयुक्तांनी तडजोड करून ती १५ टक्क्यांवर नेली आहे. तडजोडीने मजुरीवाढीचा तिढा सुटला आहे. - पेंटप्पा गड्डम, अध्यक्ष, यंत्रमाग मालक संघटना, सोलापूर.

-----------------------------

आयुक्तांनी दिलेला निर्णय आम्हाला मान्य आहे, मात्र यापुढील काळात प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन, बोनस, हक्क रजा, शैक्षणिक शिष्यवृत्ती याही गोष्टींचा लाभ कामगारांना झाला पाहिजे अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन करणार. - नरसय्या आडम, माजी आमदार.