शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूर तालुक्यातील १३४ जणांना केले हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:19 IST

तालुका पोलीस ठाण्यांतर्गत १०७ कलमानुसार (८०), ११० कलमानुसार (३४), १४४ (२) कलमानुसार (६२), १४९ कलमानुसार (४२९) व महाराष्ट्र प्रोव्हिशन ...

तालुका पोलीस ठाण्यांतर्गत १०७ कलमानुसार (८०), ११० कलमानुसार (३४), १४४ (२) कलमानुसार (६२), १४९ कलमानुसार (४२९) व महाराष्ट्र प्रोव्हिशन कलम ९३ प्रमाणे १७ जणांवर प्रतिबंधक कारवाई केली. ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत १०७ कलमानुसार (२५), ११० कलमानुसार (१३), १४४ (२) कलमानुसार (३२), १४९ कलमानुसार (३६६) व महाराष्ट्र प्रोव्हिशन कलम ९३ प्रमाणे (१५), करकंब पोलीस ठाण्यांतर्गत १०७ कलमानुसार (५८), ११० कलमानुसार (७), १४४ (२) कलमानुसार (४०), १४९ कलमानुसार १२८ जणांवर प्रतिबंधक कारवाई केली.

ही कारवाई पोलीस निरीक्षक अरुण पवार, पोलीस निरीक्षक किरण अवचट, पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील यांनी केली आहे.

सहा वाळूमाफिया हद्दपार

पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीतील वाळूविषयक वारंवार गुन्हे केलेले पंढरपूर शहरातील चार व ग्रामीण भागातील एक अशा सहाजणांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ (१) (अ) (ब) प्रमाणे हद्दपारीची कारवाई केली आहे. यामध्ये सूरज विष्णू पवार, महादेव बाळू काळे (रा. जुनी वडार गल्ली), राजू ऊर्फ रामा तिम्मा बंदपट्टे (रा. संतपेठ), लहू बाबू चव्हाण (रा. ज्ञानेश्वरनगर झोपडपट्टी, पंढरपूर), नागेश शिवाजी घोडके (रा. बोहाळी), ऋतिक ऊर्फ दादा अरुण लामकाने (रा. पिराची कुरोली, ता. पंढरपूर) यांचा सहभाग आहे.

पंढरपूर उपविभागात एवढी कारवाई

पंढरपूर पोलीस उपविभागात १०७ कलमानुसार (३२८), ११० कलमानुसार (१६७), १४४ (२) कलमानुसार (१३४), १४९ कलमानुसार (१०७२) व महाराष्ट्र प्रोव्हिशन कलम ९३ प्रमाणे ६५ जणांवर प्रतिबंधक कारवाई केली. आगामी निवडणूक शांततेने, भयमुक्त वातावरणात पार पाडण्याकरिता वरीलप्रमाणे प्रतिबंधक कारवाई पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली आहे.