समुद्रात फ्रीडायव्हिंगचा आनंद लुटत असताना एका महिलेवर नर्स शार्कने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली. व्यवसायाने वकील आणि छंद म्हणून सर्फिंग करणाऱ्या ३६ वर्षीय तायने काचोइरा दलाझेन या या भीषण हल्ल्यातून थोडक्यात बचावल्या आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, सागरी जीवांच्या अनपेक्षित वर्तनाबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दलाझेन या फर्नांडो डी नोरोन्हा द्वीपसमूहात फ्रीडायव्हिंग करत अचानक एका नर्स शार्कने त्यांचा उजवा पाय जबड्यात पकडला आणि त्यांना समुद्राच्या तळाकडे ओढण्याचा प्रयत्न केला. जीव वाचवण्यासाठी दलाझेन यांनी आटोकाट संघर्ष केला. परंतु, शार्कची पकड अत्यंत मजबूत होती. अखेर, सोबत असलेल्या टूर गाईडने प्रसंगावधान राखत शार्कवर जोरदार प्रहार केला, ज्यामुळे शार्कने आपली पकड सोडली आणि मोठा अनर्थ टळला.
हल्ल्यानंतर दलाझेन यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. सुदैवाने, त्यांच्यासोबत त्यांचे एक त्वचारोगतज्ज्ञ होते, ज्यांनी रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांना तातडीने प्रथमोपचार दिले. स्थानिक रुग्णालयात त्यांच्या जखमांवर उपचार करण्यात आले. या संकटकाळातही दलाझेन यांनी कमालीचे धैर्य दाखवले. सोशल मीडियावर पोस्ट करताना त्यांनी गमतीने म्हटले की, "माझ्या मांडीला चावा घेताना शार्कचा एक दात नक्कीच पडला असेल!" या विनोदी कमेंटमधून त्यांची समुद्रात परत जाण्याची जिद्द आणि सकारात्मकता दिसून आली.
या घटनेनंतर सागरी वन्यजीव आणि मानवी परस्परसंवादावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 'चिको मेंडेस इन्स्टिट्यूट फॉर बायोडायव्हर्सिटी कन्झर्व्हेशन'च्या नियमांनुसार हे क्षेत्र संरक्षित आहे. तज्ज्ञांचे असे मत आहे की, पर्यटकांकडून पाण्यात बेकायदेशीरपणे अन्न टाकतात, त्यामुळे पाण्यातील मासे आक्रमक होतात. ही घटना सागरी पर्यटनासाठी एक धडा ठरली असून फ्रीडायव्हिंग करणाऱ्या लोकांना नियमांचे पालन करण्याचे आणि वन्य लोकांपासून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले.
Web Summary : A free diver in Brazil was attacked by a nurse shark, which bit her leg. She fought to escape and was saved by her tour guide. She was injured but survived, showing remarkable resilience and humor after the incident.
Web Summary : ब्राजील में एक फ्री डाइवर पर नर्स शार्क ने हमला कर दिया और उसके पैर को काट लिया। महिला ने बचने के लिए संघर्ष किया और उसे उसके टूर गाइड ने बचाया। इस घटना में वह घायल हो गई, पर बच गई। घटना के बाद महिला ने साहस और हास्य दिखाया।