शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

भारीच! काश्मीरमध्ये उघडलं भारतातलं पहिलं Igloo Cafe; पर्यटक करताहेत भन्नाट इन्जॉय, पाहा फोटो

By manali.bagul | Updated: January 29, 2021 18:55 IST

Travel Tips in Marathi : हा इग्लू कॅफे बर्फानं तयार झालेला असून यात बर्फापासून तयार झालेले टेबल आहेत. यावर ग्राहकांना गरम गरम जेवण वाढण्यात येतं. 

माहामारीच्या काळात पर्यटन व्यवसायावर सगळ्यात जास्त परिणाम झाला. सर्वकाही बंद होतं त्यामुळे लोकांना घरी बसण्याशिवाय  पर्याय नव्हता. अशा स्थितीत पर्यटन व्यवसाय चालवत असलेल्या  लोकांना मोठा फटका बसला. आता हळूहळू हॉटेल आणि रेस्टॉरंट उघडायला सुरूवात झाली आहे. लोकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल मालकांनी वेगवेगळ्या आयडिया केल्या आहेत. अलिकडेच  काश्मीरमधील कोलाहोईलल स्की रिसोर्ट परिसरातील एक नवीन इग्लू कॅफे उघडण्यात आलं आहे.  हा इग्लू कॅफे बर्फानं तयार झालेला असून यात बर्फापासून तयार झालेले टेबल आहेत. यावर ग्राहकांना गरम गरम जेवण वाढण्यात येतं. 

हे इग्लू कॅफे सुमारे 15 फूट उंच आणि 26 फूट गोल आहे. भिंतीवरील कमानी दरवाजा आणि या अनोख्या कॅफेमध्ये जवळजवळ 16 अतिथींसाठी 4 टेबल्सची जागा आहे. हॉटेल मालकाने केवळ पर्यटकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने इग्लू बांधण्यास सुरुवात केली. तथापि, गुलमर्गमधील हिमवृष्टीमुळे त्यांना आणखी काम करण्यास प्रोत्साहित केले. आनंद व्यक्त करताना या कॅफेचे मालक म्हणाले की ''20 कामगारांच्या 15 दिवसांच्या मेहनतीनंतर एक चांगला कॅफे सेवेसाठी सज्ज झाला आहे.'' अरेरे! मांजरीसह खेळणं चिमुरडीला चांगलंच भारी पडलं; खेळण्याच्या नादात गमवावी लागली दृष्टी

इग्लू कॅफे सर्वसामान्यांसाठी उघडण्यात आले आहे. या कॅफेमध्ये चहा-नाश्ता आणि दुपारचे जेवण घेण्यासाठी मोठ्या संख्येने स्थानिक लोक आणि पर्यटक येत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावरील लोक या इग्लू कॅफेबद्दल खूप उत्सुक आहेत आणि कमेंट करून बरेच प्रश्न विचारत आहेत. एका वापरकर्त्याने विचारले की, "कॅफेमध्ये तापमान काय आहे आणि मेनूमधील लोकांना काय दिले जाईल?"  घटस्फोटानंतर महिलेने १४ बाळांना दिला जन्म, पोटाचा आकार बघून हैराण झाली होती दुनिया....

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सJammu Kashmirजम्मू-काश्मीर