शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Video - ही दोस्ती तुटायची नाय! ICU मध्ये आठवण; 60 वर्षांनी 86 वर्षीय महिलेची मैत्रिणीशी भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 18:25 IST

गेल्या 60 वर्षांपासून ही महिला आपल्या मैत्रिणीला भेटली नव्हती. लग्नानंतर मैत्रीण लंडनला गेला होती. त्यामुळे त्यांची भेट झाली नाही.

मैत्रीचं नातं हे नेहमीच खूप जास्त स्पेशल असतं. हे नाते काहींसाठी काही वर्षे टिकू शकतं तर काही लोकांसाठी ते आयुष्यभर टिकू शकतं. खरा मित्र कुठेही गेला तरी माणूस त्याला कधीच विसरत नाही. असाच काहीसा हृदयस्पर्शी प्रकार एका वृद्ध महिलेसोबत देखील घडला. तिचं वय 86 वर्षे आहे. ICU मध्ये दाखल झाल्यावर तिला तिच्या मैत्रिणीची आठवण झाली आणि तिने तिच्या मैत्रिणीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. 

गेल्या 60 वर्षांपासून ही महिला आपल्या मैत्रिणीला भेटली नव्हती. लग्नानंतर मैत्रीण लंडनला गेला होती. त्यामुळे त्यांची भेट झाली नाही. आता त्यांचा नातू अनिश भगतने ही गोष्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. अनिश सांगतो की, त्याची आजी आयसीयूमध्ये दाखल होती. जिथे तिने आपल्या मैत्रिणीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. अनेक वर्षांपासून आम्ही तिची मैत्रिण अंजली कवडीकर हिचा शोध घेत होतो. 

लग्नानंतर मैत्रीण लंडनला गेली. पण शेवटी आम्हाला ती सापडली. अनिश सांगतो की, त्याचे वडील त्याच्या आजीच्या मैत्रिणीच्या मुलाला लिंक्डइनवर भेटले. आम्ही त्यांच्याशी बोललो तेव्हा कळलं की त्यांची आई उपचारासाठी पुण्याला आली आहे. अनिश पुढे म्हणाला की, "आजीच्या 86 व्या वाढदिवसाला फक्त एक आठवडा उरला होता. आम्ही तिला कुठे नेत आहोत हे तिला कळत नव्हतं. पण ती सतत विचारत होती."

"आम्ही तिला तिच्या मैत्रिणीच्या घरी घेऊन गेलो. 60 वर्षांनंतर झालेल्या या भेटीनंतर दोघीही भावूक झाल्या, दोघीही एकमेकांना पाहू लागल्या. तू म्हातारी दिसतेस असं एकमेकींना म्हणू लागल्या. दोघांनीही पूर्ण वेळ एकमेकांचे हात धरले. चांगली मैत्रीण मिळणं एखाद्या आशीर्वादापेक्षा कमी नाही. दोघींनी एकत्र जेवण केलं. मग केक कापला. आजी तिच्या मैत्रिणीकडे आठवडाभर राहिली." 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल