शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण असं? जरा थांब! कपलचा 'तो' Video तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 12:13 IST

Video - एका कपलचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते स्कूटीवर रोमान्स करताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर एका कपलचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते स्कूटीवर रोमान्स करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये ती तरुणी तिच्या प्रियकराच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. चालत्या स्कूटीवर तिने त्याला मिठी मारली. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर लोक या कपलवर खूप टीका करत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे. हा व्हिडिओ मुंबईतील असल्याचं सांगितलं जात आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवरवर वांद्रे बझ नावाच्या अकाऊंटने हा व्हिडीओ  शेअर केला आहे. हा धोकादायक स्टंट करताना कपलने शाल घेतली आहे. त्यांच्या या कृतीवर संतप्त झालेल्या लोकांनीही रोड सेफ्टीबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे तरुणाने स्कूटी चालवताना हेल्मेट घातलं नव्हतं. "वांद्रे रेक्लेमेशनमध्ये या साहसी कपलच्या स्कूटी राईडने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मुंबई पोलीस, आम्ही तुम्हाला विनंती करतो की रस्त्यावरील प्रत्येकाची सुरक्षा सुनिश्चित करा" असं या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं आहे. 

लोकांनी कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओबद्दल त्यांच्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका युजरने "हे लोक असं करून केवळ लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना माहीत आहे की अशा प्लॅटफॉर्मवर त्यांचा व्हिडीओ शेअर केला जाईल आणि पोलिसांना टॅग केलं जाईल आणि त्यावर कारवाई देखील केली जाईल. या लोकांना फक्त चर्चेत राहायचं असतं" असं म्हटलं आहे. 

आणखी एका युजरने लिहिलं आहे की, "पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करावी. हे रस्त्यावरील प्रत्येकासाठी धोकादायक आहे. याचा निषेध केला पाहिजे." वर्दळीच्या रस्त्यावर अशी घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही दिल्लीच्या रस्त्यावर चालत्या स्कूटीवर कपल एकमेकांना मिठी मारताना दिसलं होतं. त्याचा व्हिडीओ गेल्या वर्षी चांगलाच व्हायरल झाला होता. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल