शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

बाथरूममधील बकेट आणि मगावरील काळे-पिवळे डाग दूर करण्याचे सोपे उपाय, एकदा कराच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 10:48 IST

Bathroom Bucket Cleaning Tips : अनेकांना हे डाग दूर करण्याचे उपाय माहीत नसतात. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जेणेकरून तुमच्या बाथरूममधील या वस्तू चकाचक दिसतील.

Bathroom Bucket Cleaning Tips : सामान्यपणे जास्तीत जास्त घरांमधील बाथरूममध्ये प्लास्टिकच्या बकेट, मग, टब आणि स्टूलचा वापर केला जातो. मात्र, प्लास्टिकच्या या वस्तू काही दिवसांमध्येच खराब होतात. यांवर पिवळे काळे चिकट डाग लागतात. अशात कुणी पाहुणे घरी आले आणि त्यांना ते दिसले तर बरोबर वाटत नाही. अनेकांना हे डाग दूर करण्याचे उपाय माहीत नसतात. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जेणेकरून तुमच्या बाथरूममधील या वस्तू चकाचक दिसतील.

जर बाथरूममधील बकेट, मग किंवा स्टूलवर हे वेगवेगळे डाग किंवा चिकटपणा असाच राहिला तर यावर अनेक घातक बॅक्टेरियाही चिकटून राहतात. जे घरातील सगळ्यांसाठीच घातक ठरू शकतं. अशात या गोष्टी स्वच्छ करण्यासाठी काय उपाय करावे हे आज जाणून घेऊया...

बेकिंग सोडा आणि व्हिनेगर

प्लास्टिकची बकेट आणि मगवरील चिकट पिवळे, काळे डाग दूर करण्यासाठी बेकिंग सोडा आणि व्हिनेगर समान प्रमाणात मिक्स करून पेस्ट तयार करा. नंतर ही पेस्ट बकेट आणि मगावरील डागांवर लावून काही वेळ ठेवा. त्यानंतर पाण्याते ते स्वच्छ करा.

लिंबाने दूर होतील डाग

लिंबामध्ये अ‍ॅसिटिक अ‍ॅसिड असतं, ज्यामुळे पाण्याचे डाग सहजपणे दूर होण्यास मदत मिळते. अशात बाथरूम बकेट किंवा प्लास्टिकच्या वस्तू चमकवण्यासाठी तुम्ही लिंबाचा वापर करू शकता. लिंबाचा रस या वस्तूंवर ३० मिनिटांसाठी लावून ठेवा. नंतर पाण्याने आणि ब्रशने डाग दूर करा.

ब्लीचचा करा वापर

बाथरूमधील बकेट आणि मगाचे डाग काढण्यासाठी तुम्ही ब्लीचचा वापरही करू शकता. ब्लीच पाण्यात भिजवून या वस्तूंवर काही वेळांसाठी लावून ठेवा. त्यानंतर पाण्याने या वस्तू धुवून घ्या.

हायड्रोजन पॅरोक्साइड

हायड्रोजन पॅरोक्साइड एक चांगला पर्याय आहे. ज्याने डाग आणि चिकटपणा दूर होण्यास मदत मिळते. एका स्प्रे बॉटलमध्ये हायड्रोजन पॅरोक्साइड आणि पानी समान प्रमाणात मिक्स करा. हे मिश्रण डाग असलेल्या वस्तूंवर स्प्रे करा. १० ते १५ मिनिटे ते तसंच राहू द्या आणि नंतर पाण्याने धुवून घ्या.

भांडी घासण्याचं पावडर

भांडी घासण्याचं पावडरही प्लास्टिकवरील डाग दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं. एका भांड्यात भांडी घासण्याचं पावडर घ्या आणि त्यात पाणी मिक्स करा. ही पेस्ट डाग असलेल्या जागांवर लावा आणि १० ते १५ मिनिटे तसेच ठेवा. नंतर एका ब्रशच्या मदतीने डाग घासून घ्या.

टॅग्स :Cleaning tipsस्वच्छता टिप्सSocial Viralसोशल व्हायरल