शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद म्हणजे भ्रष्टाचाराचा अड्डा

By admin | Updated: June 10, 2016 00:13 IST

राजन तेली : पंकजा मुंडे यांच्याकडे करणार तक्रार, पदाधिकाऱ्यांमार्फत अनेक निकृष्ट काम

सावंतवाडी : जिल्हा परिषदेवर कुणाचाही अंकुश नसल्याने पदाधिकाऱ्यांमार्फत अनेक निकृष्ट कामे होत आहेत. याबाबत जिल्हापरिषदेविरूद्ध अनेक तक्रारी वाढल्या असल्याने जिल्हा परिषद भष्ट्राचाराचा अड्डा बनत आहे, अशी टिका भाजपचे सरचिटणीस राजन तेली यांनी पत्रकार परिषदेतून केली. येथील पर्णकुटी विश्राम गृहावर आयोजित पत्रकार परिषदेत तेली बोलत होते. याप्रसंगी तालुकाध्यक्ष मनोज नाईक, यशवंत आठलेकर, शहराध्यक्ष आनंद नेवगी, महिला तालुकाध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, परिणीता वर्तक, निशांत तोरसकर, राजू गावडे, विराग मडकईकर आदी उपस्थित होते. यावेळी तेली म्हणाले, जिल्हा परिषदेचे रस्ते निकृष्ट दर्जाचे झाले असून विहिरी अस्तित्वात नसतानाही बिले काढली जात आहेत. तर कृषी विभागातील खरेदीही टेंडरशिवाय केली, नवीन अंगणवाडीत उभारल्या पण आवश्यक असणाऱ्या विद्युत पुरवठा सारख्या सोयी मात्र दिल्या नाहीत. अशा अनेक कामात जिल्हा परिषद अपयशी ठरत आहे. जिल्ह्यातील अनेक कामांसाठी शासन निधी देऊनही विकासाला खिळ बसली आहे. याबाबत संबंधित खात्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे तेली यांनी सांगितले. तसेच वेळ पडली तर जिल्हा परिषदेविरूद्ध जन आंदोलन करणार असल्याचा इशारा तेली यांनी दिला. पालकमंत्र्यांवर आपला कोणताही रोष नसून त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी आलेल्या निधीच्या नियोजनासाठी बैठका घ्याव्यात. तसेच अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवावा. अधिकारी ऐकत नसेल तर कारवाई करावी. तरच विकासकामे होऊ शकतात, अन्यथा काहीही होऊ शकत नाही. तसेच विधान परिषदेवर निवडून आलेले आमदार नारायण राणे व रविंद्र फाटक यांचे अभिनंदन राजन तेली यांनी यावेळी केले. काँग्रेस जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी राजन तेली विषारी सर्प असल्याचा उल्लेख केला होता. यावर दत्ता सामंत हे राजकारणात माझा कार्यआपण चिल्लर कार्यकर्त्यांना उत्तरे देत नाही, अशी प्रतिक्रिया राजन तेली यांनी पत्रकार परिषदेतून दिली. (वार्ताहर)स्वत:च योजना लाटणारे सदस्य काही जिल्हा परिषद सदस्यांनी शासनाच्या काही योजनांचा स्वत:हून लाभ घेतला आहे. शासनाच्या कोणत्याही योजनेचा सदस्याला अशाप्रकारे लाभ घेता येऊ शकत नाही. त्याचे सदस्यपद रद्द होऊ शकते. आतापर्यंत दोन सदस्यांनी लाभ घेतलेल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचेही राजन तेली यांनी यावेळी स्पष्ट केले.