शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
4
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
5
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
6
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
7
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
8
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
9
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
10
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
11
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
12
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
13
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
14
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
15
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
16
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
17
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
18
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
19
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडीही होत नाही-डब्यालाही नेता येते

नाट्य चळवळीला चालनेसाठी तरुणांचा पुढाकार

By admin | Updated: March 16, 2016 23:50 IST

‘स्वराध्या फाऊंडेशन’ची स्थापना : एप्रिल महिन्यात राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा

मालवण : मालवण ही कलाकारांची खाण म्हणून ओळखली जाते. नाट्य क्षेत्रासह गीतगायन, भजन आदी कला प्रकारात अग्रेसर असलेल्या मालवण नगरीत नाट्यक्षेत्राची चळवळ मंदावली. मालवणच्या नाट्य चळवळीला पुन्हा एकदा उभारी मिळावी या दृष्टीकोनातून मालवण येथील समविचारी तरुणांनी स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी ‘स्वराध्या फाऊंडेशन’ संस्थेची स्थापना केली आहे. मालवणातील मंदावलेल्या नाट्य चळवळीला उभारी देण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला आहे. ‘स्वराध्या फाऊंडेशन’च्यावतीने मालवणात नाट्यक्षेत्राशी संबंधित विविध उपक्रम, कार्यशाळा तसेच स्पर्धा घेण्यात येणार आहे. संस्थेचे पहिलेच वर्ष असल्याने आधुनिक नाट्यसृष्टीचे जनक कै. मामासाहेब वरेरकर यांच्या नावाने ‘मामा वरेरकर करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १६ व १७ एप्रिल रोजी मामा वरेरकर नाट्यगृह येथे होणार असून उद्घाटक म्हणून वस्त्रहरणकार तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत, अशी माहिती अध्यक्ष सुशांत पवार यांनी दिली. शहरातील भरड येथील हॉटेल लीलांजली येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी अध्यक्ष सुशांत पवार, उपाध्यक्ष गौरव ओरसकर, खजिनदार गौरव काजरेकर, रुपेश नेवगी, सहसचिव विनायक भिलवडकर, महेश काळसेकर आदी उपस्थित होते. यावेळी रुपेश नेवगी यांनी मामा वरेरकर यांच्या नावाने स्पर्धेचे आयोजन करण्यामागचे उद्दिष्ट स्पष्ट केले तर पवार यांनी मालवणात नाट्यसंस्कृतीला चालना मिळावी या दृष्टीने संस्थेचे स्थापना करण्यात आली असून ‘चळवळ नाटकाची, अस्मिता मालवणची’ या ब्रीदवाक्याने संस्थेची वाटचाल राहील, असे सांगितले. नाट्य संस्कृतीची अस्मिता टिकावी यासाठी तरुणांनी चळवळ उभी केली आहे. आधुनिकतेने छेद देत नाट्य चळवळीत भरीव कार्य करणार, असेही ओरसकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)स्पर्धेची पारितोषिके ‘स्वराध्या फाऊंडेशन’च्यावतीने घेण्यात येणाऱ्या मामा वरेरकर करंडक एकांकिका स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे १५ हजार, १२ हजार, ८ हजार रुपये, चषक व प्रमाणपत्र तसेच उत्तेजनार्थ संघाला ५ हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे. शिवाय पुरुष अभिनय, स्त्री अभिनय, दिग्दर्शन, प्रकाश योजना, पार्श्वसंगीत, नेपथ्य आणि सुजाण प्रेक्षकांना वैयक्तिक बक्षिसे ठेवण्यात आली आहे. प्रथम १२ संघाना स्पर्धेत प्राधान्य दिले जाणार आहे. इच्छुक संघांनी ५ एप्रिलपर्यंत गौरव ओरसकर यांच्याकडे नावनोंदणी करावी, असे आवाहन स्वराध्या फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.