शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

युवकास दंड, शिक्षा कायम

By admin | Updated: July 8, 2014 23:18 IST

मालवण येथील सरकारी कामात अडथळा प्रकरण

सिंधुदुर्गनगरी : सरकारी कामात अडथळा करून कानफटात मारल्याप्रकरणी संदेश मधुकर चव्हाण (वय ३४, रा. वायरी, ता. मालवण) याला मालवण न्यायालयाने दिलेली तीन महिने सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सुनिल कोतवाल यांनी अपिलात कायम केली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, मालवण तलाठी कार्यालयात हरिश्चंद्र भगवान देऊलकर हे कोतवाल या पदावर कार्यरत होते. देऊलकर हे करवसुलीची यादी घेऊन कर वसुलीसाठी शिवराम अर्जुन चव्हाण यांच्या घरी गेले होते. यावेळी संदेश चव्हाण याने कोतवाल हरिश्चंद्र देऊलकर यांच्या कामात अडथळा आणून हाताच्या थापटाने कानफटात मारली. याप्रकरणी कोतवाल देऊलकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार संदेश चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मालवण येथील न्यायालयात झालेल्या सुनावणीत आरोपी संदेश चव्हाण याला न्यायालयाने सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोन महिने सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद तसेच कानफटात मारल्याप्रकरणी १ महिना सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा एका पाठोपाठ एक अशी भोगायची आहे.या निर्णयाविरोधात संदेश चव्हाण याने येथील न्यायालयात अपील दाखल केले होते. दरम्यान, झालेल्या सुनावणीत येथील न्यायालयाने मालवण न्यायालयाने दिलेली शिक्षा अपिलात कायम ठेवली आहे. सरकार पक्षाच्यावतीने सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. अमोल सामंत यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)ग्रामसेवकांच्या मागण्यांसाठी शासन प्रयत्नशीलनारायण राणे : ग्रामसेवकांच्या शिष्टमंडळाने मांडल्या मागण्याकणकवली : ग्रामसेवकांच्या विविध मागण्या राज्यशासन प्राधान्याने पूर्णत्वास नेईल. मुख्यमंत्री तसेच ग्रामविकास मंत्री यांच्याशी प्राधान्याने मागण्यांबाबत चर्चा करून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी ग्रामसेवकांच्या शिष्टमंडळाला सांगितले.महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांसंदर्भात उद्योगमंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. तसेच कामबंद आंदोलनाबाबत त्यांना माहिती दिली. यावेळी ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वारंग, सचिव सुनील पांगम, मंगेश राणे, आर. डी. सावंत, पी. डी. जाधव, प्रशांत वर्दम, अमित कांबळे, राकेश गोवळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी कंत्राटी ग्रामसेवकांवरील अन्याय तसेच जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, वेतनश्रेणी तसेच प्रवास भत्ता मिळावा, अशा विविध मागण्यांबाबत मंत्री राणे यांच्याशी ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. संघटनेच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांना आपल्या बरोबर चर्चा करायला सांगा तसेच सुरू असलेले आंदोलन प्रथम स्थगित करा, असेही मंत्री राणे यांनी यावेळी ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. (वार्ताहर)