शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील युवकाला कारने चिरडले

By admin | Updated: December 30, 2016 23:45 IST

पर्यटकांचा अतिउत्साहीपणा अंगलट : युवक गंभीर, मालवण दांडी येथील घटना

मालवण : नाताळाच्या सुटीत मालवणात पर्यटनासाठी आलेल्या पुणे येथील पर्यटकांना समुद्रात गाडी चालविणे चांगलेच अंगलट आले. स्कॉर्पिओ गाडीच्या दर्शनी भागावर (बॉनेट) बसून आनंद लुटत असताना तोल जाऊन समुद्रात फेकल्या गेलेल्या अनिकेत महेश बारजेस (वय २६, रा. बालेवाडी, पुणे) या युवकाला त्याच्या कारच्या मागोमाग असलेल्या एका कारने चिरडले. यात अनिकेत याच्या दोन्ही पायांना व हाताला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी दांडी किनाऱ्यावर घडली. गंभीर जखमी झालेल्या अनिकेत याला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला अधिक उपचारासाठी रात्री पुणे येथे हलविण्यात आल्याचे समजते. या अपघाताची नोंद पोलिस ठाण्यात झाली नव्हती. पुणे येथील पर्यटकांच्या दोन गाड्या मालवण दांडी येथे पर्यटनासाठी आल्या होत्या. यावेळी दोन्ही गाडीतील युवकांनी दांडी किनाऱ्यावर चारचाकीमधून रपेट मारण्याचा निर्णय घेतला. स्कॉर्पिओ गाडी व मारुती सुझुकी गाडी समुद्राच्या पाण्यात उतरवून आनंद लुटण्यास पुण्यातील पर्यटकांनी सुरुवात केली. यावेळी पुढे असलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील अनिकेत हा गाडीच्या दर्शनी भागावर बसून पाण्याच्या कारंज्याचा आनंद लुटत असताना त्याचा तोल जाऊन हा अपघात घडला. (प्रतिनिधी) काही क्षणात दुसऱ्या कारने चिरडलेअनिकेतचा समुद्रात तोल गेल्यानंतर स्कॉर्पिओच्या मागोमाग असलेली त्यांच्याच सहकाऱ्यांची मारुती सुझुकी अनिकेतच्या हात व पायावरून गेली. या अपघातात अनिकेत गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले. एकूणच पर्यटकांचा अतिउत्साहीपणा चांगलाच अंगलट आला.