शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

युवा साहित्य दिंडीला अवघी तरूणाई अवतरली

By admin | Updated: January 23, 2016 23:19 IST

कोकण मराठी साहित्य परिषद : झांज, लेझीमच्या तालावर साहित्यप्रेमी थिरकले...

देवरूख : कोमसापतर्फे आयोजित केलेल्या कोकण विभागीय साहित्य संमेलनाची साहित्य दिंडी शनिवारी सायंकाळी देवरूख शहरातून काढण्यात आली. झांज पथक, लेझीम पथक व विविध चित्ररथ यांमुळे ही साहित्य दिंडी वैशिष्ट्यपूर्ण ठरली. दिंडीमध्ये सुमारे १५०० साहित्यप्रेमी सहभागी झाले होते. साहित्य संमेलनाचे उद्घाटन रविवारी होणार आहे. साहित्य दिंडीचा प्रारंभ सद्गुरु लोकमान्य वाचनालय येथून करण्यात आला. स्वागताध्यक्ष रोहन बने, संमेलनाध्यक्ष दक्षता लिंगायत, उद्घाटक अशोक नायगावकर, माजी आमदार सुभाष बने, कोमसापचे जिल्हाध्यक्ष सुरेश खटावकर, देवरूख महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य सुरेश जोशी यांच्यासह कोमसाप शाखेचे सर्व पदाधिकारी, युवा साहित्यिक, नागरिक व विद्यार्थीवर्ग उपस्थित होता. अनमोल साहित्य असलेली पालखी मान्यवरांनी घेऊन ही दिंडी सुरू करण्यात आली. मातृमंदिर, बाजारपेठ, रिक्षा स्टॅण्ड, शिवाजी चौकमार्गे माटे - भोजने सभागृह अशी ही दिंडी काढण्यात आली. दिंडीच्या सुरुवातीला ढोल पथक, सावित्रीबाई महिला विद्यालयाचे झांजपथक, देवरूख नं. ३ शाळेच्या विद्यार्थ्यांचा संतांची परंपरा असलेला देखावा, तसेच शाळा नं. ४ शाळेचे संस्कृतीचे दर्शन जय मल्हार असा देखावा सादर करण्यात आला होता. पाध्ये मीडियम स्कूलचे लेझीम पथक, न्यू इंग्लिश स्कूल, देवरूखचा एन. एस. एस. विभाग, विद्यार्थी, तायक्वाँदोपटू व राजू काकडे हेल्प अ‍ॅकॅडमीचा महिला विभाग सामील झाला होता. रॅलीत प्रत्येक चौकामध्ये फटाक्यांची आतषबाजी व झांज पथकाच्या विविध नृत्यांच्या स्टेप साकारण्यात आल्या. या नृत्याला उपस्थितांनी दाद देऊन कौतुक केले. या रॅलीत शंकर शेट्ये, बापू शेट्ये, पपू नाखरेकर, संमेलन समिती अध्यक्ष दीपक लिंगायत, संमेलनप्रमुख युयुत्सू आर्ते, कार्यवाह प्रमोद हर्डीकर, युवा शक्तीप्रमुख प्रशांत परांजपे, अभिमन्यू शिंदे, नगराध्यक्ष नीलेश भुरवणे, उपनगराध्यक्ष अभिजीत शेट्ये, नगरसेवक प्रफुल्ल भुवड, अश्विनी सावंत, निकिता रहाटे, स्मिता लाड, माजी नगराध्यक्ष नीलम हेगशट्ये, नमिता क ीर, जिल्हा परिषद सदस्य दिलीप बोथले, शशांक घडशी, सुरेंद्र्र माने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)