शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत खुनी हल्ल्यात तरुण गंभीर

By admin | Updated: April 23, 2017 23:43 IST

एकाला अटक; वादातून हल्ला झाल्याचा अंदाज

रत्नागिरी : तीन महिन्यांपासून आपापसांत चाललेल्या वादातून शनिवारी रात्री तीन बुरखाधारी व्यक्तींनी केलेल्या प्राणघातक हल्लयात सिद्धेश लक्ष्मीकांत मालगुंडकर हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी नीलेश महादेव आखाडे याला ताब्यात घेतले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी; सिद्धेश मालगुंडकर (वय २५, रा. खेर संकुल, रत्नागिरी) याचे बाजारपेठेमध्ये दुकान आहे. शनिवारी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून तो दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाला. टिळक आळीतील खेर संकुलाजवळ आला असता तीन बुरखाधारी व्यक्तींनी धारदार हत्याराने त्याच्यावर हल्ला केला. त्यांनी त्याच्या पाठीवर, छातीवर, हातावर असे १३ वार केले. जीव वाचविण्यासाठी त्याने आरडाओरडा केला. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्यांच्या दिशेने धाव घेतली. यावेळी तिन्ही बुरखाधारींनी तेथून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सिद्धेशला नागरिकांनी तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू असून, त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुशांत वराळे घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पोलिसांनी तासाभरातच नीलेश आखाडे (२५, रा. विश्वनगर, रत्नागिरी) याला ताब्यात घेतले. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली. (वार्ताहर)मित्राला त्रास देऊ नकोहल्लेखोर तरुणांनी वार करतानाच अन्य एका तरुणाचे नाव घेऊन आमच्या मित्राला त्रास देऊ नको, असे उद्गार काढल्याची चर्चा आहे. तशी प्राथमिक माहिती मिळाल्यामुळेच पोलिस एका आरोपीपर्यंत तत्काळ पोहोचू शकले. आता उर्वरित दोघांनाही लवकरच ताब्यात घेण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.