शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

वाशी मार्केटात आंबा विक्रीस नेण्याची परवानगी मिळावी, मुख्यमंत्री ठाकरेंना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 16:22 IST

वाशी मार्केट येथे आंबा विक्रीस नेण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी करणारे निवेदन देवगड हापूस आंबा बागायतदार यांनी पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यासाठी सुपूर्द केले.

ठळक मुद्देवाशी मार्केटात आंबा विक्रीस नेण्याची परवानगी मिळावीदेवगड हापूस बागायतदार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निवेदन सादर

सिंधुदुर्गनगरी : देवगड हापूस आंबा बागायतदार शेतकरी, व्यापारी यांच्यावर आंबा विक्रीचे आलेले संकट दूर करून जीवनावश्यक वस्तूमध्ये हापूस आंब्याचा समावेश करावा आणि वाशी मार्केट येथे आंबा विक्रीस नेण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी करणारे निवेदन देवगड हापूस आंबा बागायतदार यांनी पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यासाठी सुपूर्द केले. निवेदन देताना जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर उपस्थित होते.आंबा बागायतदार यांच्यावरील आलेले संकट दूर करावे या मागणीसाठी सोमवारी पालकमंत्री उदय सामंत यांची बागायतदार यांनी भेट घेतली.या निवेदनावर जयेश नर, विष्णू घाडी, फरीद काझी, शकील मुल्ला, दिनेश तेली, दिलीप गुरव, नंदकुमार गुरव, चंद्रकांत गुरव, हरिश्चंद्र गोडे, अनिल गोडे, अंकुश माळकर, रवींद्र माळकर, दत्ताराम घाडी, संतोष घाडी, पांडुरंग गोठणकर, राजेंद्र परब यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यात कोरोनाचा बिमोड करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले.आंब्याचे पीक चांगले यावे यासाठी वर्षभर मेहनत घेत आहोत. या पिकावर कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण हा खर्च अवलंबून आहे. त्यामुळे गुडीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हापूस आंबा वाशी मार्केटमध्ये नेण्यास परवानगी मिळावी तसेच होणाऱ्या आमच्या नुकसानीचाही विचार करून आंबा मार्केटमध्ये नेण्यास परवानगी द्यावी व आंबा बागायतदार यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :Mangoआंबाsindhudurgसिंधुदुर्ग