शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

योगादिनी ८ हजार विद्यार्थी उपस्थित राहणार

By admin | Updated: June 20, 2015 00:39 IST

पत्रकार परिषदेत माहिती : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचा उपक्रम

रत्नागिरी : जगातील १७५ देश २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योगादिन साजरा करणार आहेत. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे जागतिक योगादिन आठ हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. विलास पाटणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपकार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, कार्यवाह अ‍ॅड. प्राची जोशी उपस्थित होत्या.आंतरराष्ट्रीय योगादिनाची पूर्वतयारी व वातावरण निर्मिती या उद्देशाने सोसायटीतील सर्व शिक्षकवृंद व निवडक विद्यार्थीवर्गाचा सराव सुरू आहे. सकाळ व सायंकाळी अशा दोन सत्रात शिक्षक व विद्यार्थ्यांचा सराव सुरू आहे. याशिवाय रत्नागिरीतील सेंट्रल जेलमधील बंदिवानांसाठीही सोसायटीतर्फे प्रशिक्षण सुरू असल्याचे अ‍ॅड. पाटणे यांनी सांगितले.दि. २१ जून रोजी महाविद्यालयाच्या जवाहर मैदानावर सकाळी ७.३० ते ८.१५ या कालावधीत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी ध्यान, योगासने व प्राणायाम अशी प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत.या कार्यक्रमाला चाणक्य मंडळ, पुणेचे संचालक अविनाश धर्माधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. शिवाय जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी., जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे उपस्थित राहणार आहेत. योगादिनानिमित्त प्रार्थना, ओंकार, योगासनांमध्ये वृक्षासन, ताडासन, विरासन, अर्धकटी चक्रासना, त्रिकोणासन, प्राणायाममध्ये दीर्घ श्वसन, कापलभारती, भ्रामरी त्यानंतर ध्यान, योग प्रात्यक्षिके, कल्याण मंत्र आदींचे नियोजन करण्यात आले आहे. सोसायटीअंतर्गत असलेल्या शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. पाचवीपासूनच्या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. योगासनानंतर अविनाश धर्माधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला योगाप्रेमी, आरोग्यप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अ‍ॅड. पाटणे यांनी केले आहे. जगातील १७५ देश आंतरराष्ट्रीय योगादिनात सहभागी होत असताना या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी रत्नागिरीकरानाही येथील योगा प्रात्यक्षिकात सहभाग घेऊन मिळणार आहे. या कार्यक्रमाची तयारी पूर्ण होत आहे. (प्रतिनिधी)