शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘यशदा’चे मिनी केंद्र लवकरच रत्नागिरीत

By admin | Updated: February 8, 2016 00:50 IST

साडेदहा कोटी रुपये मंजूर : शासनस्तरावरील प्रशिक्षण जिल्ह्यातच

रत्नागिरी : ‘यशदा’चे मिनी केंद्र रत्नागिरीत होणार असून, त्यासाठी १० कोटी ३५ लाख रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना जिल्ह्यातच शासनस्तरावरील प्रशिक्षण मिळणार आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विविध योजनांबाबत माहिती व प्रशिक्षण देण्यासाठी पुणे येथे ‘यशदा’चे प्रमुख केंद्र आहे. या मुख्यालयाच्या ठिकाणी विविध प्रशिक्षणे देण्यात येतात. अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी तेथे जातात. यासाठीच ‘यशदा’चे मिनी केंद्र प्रत्येक जिल्ह्यात झाल्यास त्याचा मोठा फायदा कर्मचारी व अधिकाऱ्यांना होणार आहे. ‘यशदा’चे मिनी केंद्र रत्नागिरीत होण्यासाठी गेले काही महिने ‘डाएट’चे प्राचार्य शेख प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती विलास चाळके यांनी दिली. याबद्दल सभापती चाळके यांनी समाधान व्यक्त करुन जिल्ह्याच्या ठिकाणी अशा प्रकारचे केंद्र असणे आवश्यक असल्याचे सांगितले. लवकरच हे केंद्र जिल्ह्यात होणार असल्याचे चाळके यांनी सांगितले. शासनानेही राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘यशदा’चे मिनी केंद्र देण्याचा निर्णय घेतला आहे. या केंद्रांसाठी सुरुवातीला राज्यातील २० जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक केंद्रासाठी १० लाख २५ हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. हे केंद्र २ एकर जागेत उभारण्यात येणार आहे. उभारण्यात येणाऱ्या ‘यशदा’च्या मिनी केंद्रामध्ये एमपीएससी, युपीएससी व अन्य प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. हे केंद्र जिल्ह्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. (शहर वार्ताहर)अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणारी संस्था.‘डाएट’चे प्राचार्य शेख यांच्याकडून प्रयत्न सुरू.जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती विलास चाळकेंचेही प्रयत्न.केंद्र जिल्ह्यासाठी फायदेशीर.