शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

भरकटलेली नौका किनाऱ्यावर

By admin | Updated: October 7, 2016 00:17 IST

तिसऱ्या दिवशी बंदरात : नौकेवरील खलाशी सुखरूप; कुटुंबियांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

देवगड : तांत्रिक बिघाडामुळे गेल्या दोन दिवसांपासून बंद पडलेल्या व खोल समुद्रात भरकटलेल्या एका फायबर नौकेला गस्तीनौकेच्या सहाय्याने तिसऱ्या दिवशी देवगड बंदरात आणण्यात आले.प्रभाकर पेडणेकर यांची गणेशसिध्दी ही फायबर नौका यांत्रिक बिघाडामुळे दोन दिवसांपासून बंद पडल्यामुळे खोल समुद्रात भरकटत होती. या नौकेवरील दोन्ही खलाशी सुखरूप असल्याने त्यांच्या कुटुबियांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.देवगड बंदरातील जामसंडे खाकशी येथील प्रभाकर शांताराम पेडणेकर यांच्या मालकीची गणेशसिध्दी ही फायबर नौका मंगळवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास मच्छिमारीसाठी समुद्रात गेली होती. या नौकेवर अर्जुन सुभाष सारंग (४२, रा.तांबळडेग) प्रकाश सदानंद परब (४९, रा. इळयेपाटथर) व वीरेंद्र कोयंडे हे खलाशी होते. मात्र समुद्रात नौकाजाळी टाकून झाल्यानंतर नौकेचा इंजिनाचा स्टार्टर बसत नसल्यामुळे बंद पडली. जाळी ओढून झाल्यानंतर ही नौका सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तो अपयशी ठरला. ती रात्र नौकेसह खलाशांनी समुद्रातच काढली. बुधवारी सकाळी या नौकेच्या जवळच असलेल्या चंद्रभागा नौकेवरील खलाशांना नौका बंद पडल्याचे सांगण्यात आल्यानंतर त्या नौकेवरून गणेशसिध्दी या नौकेवरील खलाशी वीरेंद्र कोयंडे याला देवगड बंदरात पाठविण्यात आले.त्यांनी देवगड बंदरात आल्यानंतर नौकामालक प्रभाकर पेडणेकर यांना समुद्रात बंद पडलेल्या नौकेबद्दल माहिती दिली. त्यानंतर पेडणेकर यांनी बंद पडलेल्या नौकेचा दुसऱ्या नौकेच्या सहाय्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा शोध लागला नाही. तिसऱ्या दिवशी गुरूवारी गिर्ये समुद्रात ३० वावामध्ये भरकटत असलेली नौका देवगड येथीलच मच्छिमारीसाठी गेलेल्या सहारा नौकेला दिसली. त्यांनी नौकेजवळ जाऊन माहिती घेतल्यानंतर यांत्रिक बिघाडामुळे दोन दिवस नौका भरकटत असल्याचे खलाशांनी सांगितले.यावेळी सहारा या नौकेच्या सहाय्याने बंद पडलेल्या नौकेला आणण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र ती ओढून आणण्यासाठी वापरात आणलेली दोरी वारंवार तुटत असल्यामुळे ही नौका आणणे अशक्य झाले. तरीही सहारा नौकेवरील खलाशांनी देवगड बंदरात आल्यानंतर पेडणेकर यांना त्यांच्या भरकटलेल्या नौकेचा जीपीएस पॉर्इंट दिल्यावर नौकेच शोध सुरु करण्यात आला. (प्रतिनिधी)