शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

लाटेत पुन्हा नौका उलटली

By admin | Updated: August 18, 2016 23:34 IST

तळाशील येथील नौका : आठवड्यातील तिसरी घटना; चार मच्छिमार बचावले

मालवण, आचरा : गेल्या आठवड्याभरात सिंधुदुर्ग किनारपट्टीवर नौका उलटल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. मालवण, वायरीपाठोपाठ तळाशील येथील बोट मुणगे किनारी उलटण्याची घटना घडली आहे. मुणगे आपेची येळ (ता. देवगड) समुद्र किनाऱ्यालगत मासेमारी करीत असताना जोरदार लाटांच्या माऱ्यात फायबर नौका (पात) उलटून त्यात असलेले चार मच्छिमार समुद्रात फेकले गेले. चारही मच्छिमारांनी पोहत समुद्र किनारा गाठला. ही घटना गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास घडली. तळाशील येथून लक्ष्मी विष्णू शेलटकर यांच्या मालकीची फायबर पात घेऊन मुणगेच्या दिशेने पहाटे चार वाजता प्रथमेश शेलटकर, परेश शेलटकर, अनिरुद्ध जुवाटकर, रामा मायबा हे मासेमारी करण्यासाठी गेले होते. यावेळी मुणगे आपेची येळ येथील किनाऱ्यालगत मासेमारी करीत असताना सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान जोरदार लाटांच्या तडाख्यात पात उलटून खडकाळ भागात आदळल्याने पातीसह इंजिन व जाळ्यांचे सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती मच्छिमारांनी दिली आहे. (प्रतिनिधी)२४ तासांतील दुसरी घटना : ११ बचावलेदरम्यान, नौका उलटण्याची घटना घडल्यावर जवळ मासेमारी करीत असलेल्या करण कांदळगावकर यांच्या नौकेतील मच्छिमारांनी तळाशील येथील मच्छिमारांना कल्पना दिली. त्यानंतर तळाशील येथील ८०-९० मच्छिमार बांधवांनी मुणगेच्या दिशेने धाव घेतली. मच्छिमारांनी खडकाळ भागात अडकलेली नौका बाहेर काढून किनाऱ्यावर आणली. या अपघातात पातीचे (नौका) मोठे नुकसान झाले आहे. पात चार दिवसांपूर्वीच खरेदी करण्यात आल्याचे समजते. अशाच पद्धतीची रापण नौका वायरी किनाऱ्यावर बुधवारी उलटण्याची घटना घडली होती. यात समुद्रात फेकले गेलेले सात मच्छिमार सुदैवाने बचावले होते. मासेमारी बंदी कालावधी ९० दिवासांचाच हवामासेमारी बंदी कालावधी हा प्रामुख्याने ९० दिवसांचा असावा, अशी मागणी गेली काही वर्षे मच्छिमारांकडून करण्यात येत आहे. १ जून ते ३१ जुलै हा कालावधी जरी मासेमारी बंदी कालावधी म्हणून जाहीर असला, तरी १ आॅगस्टनंतरही समुद्रात वाऱ्याचा व लाटांचा प्रचंड वेग असतो. त्यामुळे मासळीच्या प्रजोत्पादनासाठी ९० दिवसांचा कालावधी गरजेचे आहे. तसेच बंदी कालावधी ९० दिवसांचा झाल्यास मच्छिमार बांधवांची सुरक्षाही अबाधित राहील. त्यामुळे बंदी कालावधी १५ मे ते १५ आॅगस्ट असा करण्याचा निर्णय घेणे आवश्यक असल्याचे मत रविकिरण तोरसकर यांनी व्यक्त केले आहे.