शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

अण्णांचे लेखन कैफियत मांडणारे

By admin | Updated: January 18, 2015 00:37 IST

सतीश काळसेकर : अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाला सावंतवाडीत प्रारंभ

सिंधुदुर्ग : अण्णा भाऊ साठेंच्या साहित्यातील माणसाविषयीचा लळा हा नेहमीच वरच्या पातळीवर नेणारा आहे. त्यांनी आयुष्यभर आपल्या लेखनातून समाजाची कैफियतच मांडली, असे उद्गार ज्येष्ठ साहित्यिक सतीश काळसेकर यांनी काढले. आज, शनिवारपासून येथे सुरू झालेल्या सहाव्या राज्यव्यापी अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.संमेलनाचे उद्घाटन डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी, तर उपस्थितांचे स्वागत नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले. काळसेकर पुढे म्हणाले, अण्णा भाऊ साठेंनी लोकनाट्य, पोवाडे, वग, तमाशा, लावणी या पारंपरिक माध्यमांचा आपल्या परिवर्तनवादी संघर्षशील चळवळीसाठी उपयोग करून घेताना भरपूर काळजी घेतली आहे. त्यांनी स्वत:च्या लेखनातून कैफियतवजा लेखन केले असून, त्यांच्या लेखनाला उपहासाची धार आहे; पण अनेकदा अभिजनांच्या लेखनात विनोदासोबत बहुजनांविषयी येणारा तुच्छतावाद त्यांनी जाणीवपूर्वक दूर ठेवला.आपल्याकडे घटना आणि काळ यांच्या परस्पर संबंधावर प्रकाश टाकणारा स्थल कालपट आपण उभारू शकलेलो नाही. त्याची गरज मात्र सतत जाणवत राहते, असे सांगत श्रमिक प्रतिष्ठानने याआधी काही महत्त्वाची कामे केली आहेत. त्यामुळेच त्यांना आणि सर्वांना भविष्यातही असेच काम करावे लागणार आहे. अण्णा भाऊंच्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताचे आणि चारित्र्याचे तपशील अचूक व नेमकेपणाने यायला हवेत. कामाची जबाबदारी नव्या तरुण अभ्यासकांनी केवळ पीएच. डी. पदवी मिळविण्याच्या पातळीवर न घेता तसे संशोधन अधिक अभ्यासपूर्ण करावे, असे आवाहनही त्यांनी युवकांना केले.सध्याच्या राजकारणावर प्रकाश टाकताना केंद्रात व राज्यात आलेले भाजपचे सरकार स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या लोकशाहीशी जळवून घेईल असे आपणास वाटत नसल्याचेही त्यांनी सांगितले. गोविंद पानसरे यांनी प्रास्ताविक, तर नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी स्वागत केले. प्रा. गोविंद काजरेकर यांनी आभार मानले. काळसेकर यांनी स्वीकारली सूत्रेसंमेलनाच्या प्रारंभानंतर संमेलनाध्यक्षपदाची सूत्रे राजन गवस यांनी सतीश काळसेकर यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी कॉ. गोविंद पानसरे, साहित्यिक राजन गवस, माजी आमदार जयानंद मठकर, प्रा. आनंद मेणसे, निवृत्त आयपीएस अधिकारी एस. डी. कांबळे, प्रा. प्रवीण बांदेकर, अ‍ॅड. संदीप निंबाळकर, हरिहर वाटवे, डॉ. गोविंद काजरेकर, नगरसेविका शर्वरी धारगळकर, वैशाली पटेकर, अफरोझ राजगुरू, कीर्ती बोंद्रे उपस्थित होते.