शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

तिलारी धरणक्षेत्र परिसराची बिकट अवस्था

By admin | Updated: January 19, 2017 00:04 IST

उन्नेयी बंधाऱ्यासह रॉक गार्डन भकास : अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने परिसर ओसाड, लोकप्रतिनिधींच्या घोषणा केवळ कागदावरच, पर्यटकांमधून नाराजी

वैभव साळकर ल्ल दोडामार्गतिलारी धरणाच्या पर्यटन विकासाच्या मोठमोठ्या बाता राजकीय पुढाऱ्यांकडून मारल्या जात असताना दुसरीकडे प्रत्यक्षात मात्र तिलारी धरण परिसरातील बागबगिच्यांची अवस्था अत्यंत बिकट बनत चालली आहे. देखभाल दुरूस्तीचा अभाव आणि प्रकल्प अधिकाऱ्यांची उदासिनता यामुळे एकेकाळी तिलारी धरणाची शोभा वाढविणारा तेरवण-मेढे उन्नेयी बंधाऱ्याचा बगीचा आणि मुख्य धरणाच्या पायथ्याशी असलेल्या रॉक गार्डनची अवस्था भकास बनली आहे. राजकीय पुढाऱ्यांकडून तिलारी धरणाच्या पर्यटन विकासाच्या मोठमोठ्या बाता मारल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात कार्यवाही मात्र शून्यच असल्याने राजकारण्यांच्या वल्गना म्हणजे ‘बोलाचा भात आणि बोलाचीच कढी’ म्हणावी लागेल. केवळ अशा घोषणा कागदावरच राहिल्या आहेत. पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष न दिल्यास तालुक्याचा आणि पर्यायाने तिलारी धरणाचा पर्यटन विकास साधण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेला तिलारी धरण प्रकल्प दोडामार्ग तालुक्याच्या पर्यटन विकासासाठी जमेची बाजू आहे. भविष्यातील पर्यटन विकासाच्यादृष्टीने त्याचा विचार करून मुख्य धरणाच्या पायथ्याशी म्हैसूर येथील रॉक गार्डनच्या धर्तीवर बगीचा उभारण्यात आला. त्यासाठी त्यावेळी सुमारे १ कोटी रूपये खर्ची घालण्यात आले. त्यानंतर दरवर्षी त्या बगीचाची देखभाल-दुरूस्ती करण्याचे काम ठेकेदारी पध्दतीवर देण्यात आले. मुख्य धरणाच्या व्ह्यू पॉर्इंटवरील बगीच्याची देखील देखभाल दुरूस्ती करण्याचे काम याच पध्दतीने सुरू होते. त्यामुळे तिलारी धरणाच्या परिसराची शोभा निश्चितच वाढली होती. मुख्य धरणाला लागून असलेला तेरवण-मेढे उन्नेयी बंधारासुध्दा आकर्षून घेत होता. याठिकाणचा बगीचादेखील हिरवागार व निसर्गसंपन्न असल्यामुळे त्याचा फायदा तालुक्याच्या पर्यटन विकासाकरीता होत होता. शैक्षणिक सहली तसेच देशी-विदेशी पर्यटकही तिलारी धरणाला भेट द्यायचे. मात्र, गेल्या दोन वर्षात या बगीचांची देखभाल दुरूस्ती न झाल्यामुळे मुख्य धरणाच्या पायथ्याशी असलेला आणिं तेरवण मेढे उन्नेयी बंधाऱ्यावरील बगीच्याची अवस्था भकास झाली आहे.तिलारी धरण हा महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचा संयुक्त प्रकल्प असल्याने धरणाला भेट देण्यासाठी शैक्षणिक सहलींच्या माध्यमातून विद्यार्थी तसेच पर्यटकही येत असतात. मात्र, धरण परिसराची भकासतेकडे चाललेली अवस्था पाहून भेट देणारे विद्यार्थी, पर्यटक यांचा हिरमोड होतो. त्यामुळे तिलारी धरणाचे पर्यटनात्मक सौंदर्य अबाधित राखण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे.