शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासाने जग बदलता येते

By admin | Updated: April 13, 2015 00:05 IST

विश्वास नांगरे पाटील : सावंतवाडी येथील कार्यक्रमात प्रतिपादन

सावंतवाडी : अभ्यासाने जग बदलता येते. यामुळे लाथ मारीन तेथे पाणी काढण्याची हिंमत बाळगा व ग्रामीण मुलांनी परिस्थितीच्या आहारी न जाता कुठल्याही क्षेत्रात जाऊन उच्च क्षेत्रात प्रगती करा, असे प्रतिपादन आयपीएस लाचलुचपत विभागीय अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी केले.मनोदय ट्रस्ट, नवोदय अ‍ॅकॅडमी, नोबेल स्कॉलॅस्टिक अ‍ॅकॅडमी सावंतवाडी आणि भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या संयुक्त विद्यमाने करियर फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विश्वास नांगरे पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, उपजिल्हाध्यक्ष राजू राऊळ, सुधीर नाईक, सावंतवाडी नगरपरिषद उपनगराध्यक्ष राजेंद्र पोकळे, महादेव नाईक, पुखराज पुरोहित, माजी आमदार राजन तेली, अन्नपूर्णा कोरगावकर, रेश्मा सावंत आदी उपस्थित होते. स्पर्धा-परीक्षांची माहिती पूर्णत: आत्मसात करणे आवश्यक आहे. तसेच आपल्याबद्दल व आपल्या शत्रूबद्दल संपूर्ण माहिती ठेवा. नाही तर एका युध्दानंतर पराभवाला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे लढाई यशस्वी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या गनिमीकाव्याने खेळली पाहिजे. अभ्यास करा व जास्त उंची गाठा. पाच लाख विद्यार्थ्यांमध्ये फक्त १५० जण यशस्वी होतात. या १५० जणांमध्ये येणे आवश्यक आहे. अणूमध्ये विश्व नष्ट करण्याची ताकद असते. मग आपल्यात का नाही? अशाप्रकारे अनेक उदाहरणे व जीवनातील अनेक प्रसंग यावेळी नांगरे पाटील यांनी सांगितले. २६/११ दहशतवादी हल्ल्याची माहिती दीड महिने अगोदर असल्याचा गौप्यस्फोट यावेळी नांगरे पाटील यांनी केला. गुप्तहेर विभागाने दीड महिना या संदर्भात माहिती दिली असून ताज हॉटेलची बैठक ३० सप्टेंबरला घेण्यात आली होती. ताज हॉटेलच्या काचेच्या गेटवर लोखंडी ग्रील बसविण्याचे आदेशही दिले होते. मात्र, लोखंडी ग्रील न बसविल्याने दुर्घटना घडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवाय २४ व २५ नोव्हेंबर रोजी ताज हॉटेल जवळील परिसर साफ केला असल्याचेही यावेळी विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले. मरणाची सामग्री घेऊन दहशतवादी आले होेते. परिसराची पूर्ण माहिती असल्याने या लढाईत यशस्वी झालो असल्याचे यावेळी नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले. सत्यासाठी संघर्ष केला. प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करीत आलो. तुमची साथ असेल, तर सिस्टिमशी संघर्ष करेन असेही नांगरे पाटील यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. पत्र्याची पेटी घेऊन गावातून मुंबईत आलो. ताज हॉटेल, अ‍ॅम्बेसिडर हॉटेल, आॅबेराय हॉटेलमध्ये चहा पिण्याचे धाडस नाही. फिल्म स्टारना गेटवरून डोके वर काढून पाहत होतो. मात्र, त्यानंतर वर्षभर कंबरडे मोडेपर्यंत अभ्यास केला व ज्या ताज हॉटेलमध्ये चहा पिण्याचे स्वप्न पाहत होतो, तेच हॉटेल २६/११ ला माझी वाट पाहत होते. फिल्मस्टार मला भेटण्यासाठी दोन-दोन दिवस वाट पाहत होते. हे सर्व अभ्यासानेच होऊ शकते. यामुळे अभ्यासानेच जग जिंकता येते, असेही यावेळी नांगरे पाटील यांनीसांगितले. (वार्ताहर)