शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘दाभोळ’च्या कामगारांचे आठ महिने पगारापासून वंचित

By admin | Updated: January 25, 2016 01:01 IST

भारती शिपयार्ड : दाभोळमधील कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर उद्यापासून उपोषण

दाभोळ : दाभोळ येथील भारती शिपयार्ड कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना आठ महिन्यांचा पगारच देण्यात आलेला नाही. चार वर्षांचा दिवाळी बोनस तसेच अधिक कामाचे पैसेही अदा करण्यात आले नसल्याचे या कामगारांचे म्हणणे असून, या विरोधात २६ जानेवारी रोजी ३९ कामगार कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर उपोषणाला बसणार आहेत. दाभोळ उसगाव येथील भारती शिपयार्ड कंपनीचा जहाज बांधणी व दुरुस्तीचा प्रकल्प याठिकाणी सुरु आहे. या कंपनीमध्ये दाभोळ उसगाव पंचक्रोशीसह अन्य तालुक्यांतील कामगार कामाला आहेत. मात्र, गेल्या चार वर्षापासून कंपनीला आर्थिक फटका बसल्याने त्याचा परिणाम कंपनीतील कामगारांच्या वेतनावर झाला आहे. या मंदीचा फटका ६०० हून अधिक कामगारांना बसला आहे. या कामगारांना ८ महिन्यांचा पगार, चार वर्षांचा दिवाळी बोनस व २४ महिन्यांची अधिक सेवेची रक्कम मिळाली नसल्याचे या कामगारांनी म्हटले आहे. थकीत राहिलेला पगार व अन्य रक्कमेमुळे कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. या विरोधात कंपनीच्या ३९ कामगारांनी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे कंपनी व्यवस्थापनाला दिला आहे. कामगारांच्या हितासाठी संघटनाही स्थापन करण्यात आली. मात्र, या संघटनेकडूनही पुरेसे सहकार्य मिळत नसल्याने या असहकार्याविरोधात उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागत असल्याचे या कामगारांनी म्हटले आहे. यावर आता कोणता तोडगा निघतो, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)