शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गोळीबार मैदानाबाबत अफवा पसरविण्याचे काम : दत्तात्रय शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2016 00:37 IST

या वार्षिक सरावामध्ये ९०५ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सराव केला. यामध्ये एस. एल. आर., ए के-४७, कार्बाइन व पिस्टल यांचा सराव करण्यात आला.

सिंधुदुर्गनगरी : कुडाळ- नेहरूनगर येथील पोलिस गोळीबार मैदान हे पूर्णत: सुरक्षित आहे. या मैदानाबाबत गैरसमज होऊ नये म्हणून सरावाच्या दुसऱ्या दिवसापासून परिसरात पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मात्र सराव पूर्ण होईपर्यंत कोठेही गोळ्या गेलेल्या आढळलेल्या नाहीत. त्यामुळे या मैदानाबाबत गैरसमजातून कोणीतरी अफवा पसरविल्याचे निष्पन्न होत आहे, असे पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी स्पष्ट केले. सोनवडे पार येथे मिळालेल्या ‘त्या’ गोळ्यांची चौकशी मात्र अद्याप सुरू आहे. पाच दिवसात वार्षिक गोळीबार सरावामध्ये २५ हजार १८० गोळ्या झाडण्यात आल्या. यात ३ पोलिस कर्मचाऱ्यांना बेस्ट फायरर म्हणून सन्मानही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कुडाळ-नेहरूनगर येथील लॉँग आर्म फायरींग रेंजबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दत्तात्रय शिंदे यांनी हे गोळीबार मैदान पूर्णत: सुरक्षित असल्याची ग्वाही दिली. ते म्हणाले २८ मे रोजी या गोळीबार मैदानावरील काही गोळ्या सोनवडेपार परिसरात आढळून आल्या. त्यानंतर २९ तारखेपासून सराव पूर्ण होईपर्यंत त्या परिसरात एक पोलिस निरीक्षक, तीन अधिकारी, व २० कर्मचारी तैनात करण्यात आले होते. ज्या माणसांना गोळ्या आढळून आल्या होत्या त्यांनाही घेऊन परिसरात पाहणी केली. मात्र सराव होईपर्यंत तेथे पुन्हा गोळ्या आढळल्या नाहीत. या वार्षिक सरावामध्ये ९०५ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सराव केला. यामध्ये एस. एल. आर., ए के-४७, कार्बाइन व पिस्टल यांचा सराव करण्यात आला. यामध्ये २५ हजार १८० गोळ्या झाडण्यात आल्या. मात्र यापैकी एकही गोळी सोनवडे गावात तसेच आजूबाजूच्या परिसरात आढळून आली नाही. मात्र सोनवडे-पारमध्ये आढळून आलेल्या ‘त्या’ तीन गोळ्यांचा तपास मात्र अजून सुरू आहे. गेल्या महिन्यात सावंतवाडी येथील मोती तलावात उडी मारून आत्महत्या केलेल्या कैद्याप्रकरणी त्याला घेऊन जाणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी सावंतवाडी पोलिस उपनिरीक्षक करत आहेत. चौकशी अहवाल प्राप्त होताच याबाबतची आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हा पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)एस.व्ही तवटे प्रथमया गोळीबार सरावामध्ये उत्कृष्ट फायरर म्हणून पोलिस शिपाई एस. व्ही. तवटे यांनी प्रथम क्रमांक मिळविला.पोलिस शिपाई आर. सी. सावंत यांनी द्वितीय तर पोलिस शिपाई के. टी. सोनावणे व ए. डी. पवार यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला. हा गोळीबार सराव केल्यामुळे अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांचा निशाणा चांगला झाला आहे.