शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या कामाचा प्रारंभ कोकणी जनतेच्या आशीर्वादाने

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 06:17 IST

शिवसेनेच्या कोणत्याही कार्याचा प्रारंभ कोकणच्या जनता जनार्दनाचा आशीर्वाद घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही.

सिंधुदुर्ग : शिवसेनेच्या कोणत्याही कार्याचा प्रारंभ कोकणच्या जनता जनार्दनाचा आशीर्वाद घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. आमची ही जनआशीर्वाद यात्रा राजकीय यात्रा नसून जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी यात्रेच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आलो आहे. बेरोजगारीमुक्त, दुष्काळमुक्त, सुरक्षित व सुदृढ असा स्वप्नातला महाराष्ट्र घडवायचा असल्याने तुमचे प्रेम व आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. माझ्याबरोबर तुम्ही असाल तर असा महाराष्ट्र घडविण्यापासून आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही, असा विश्वास युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी कुडाळ येथील विजय संकल्प मेळाव्यात व्यक्त केला.आदित्य यांच्या जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात वेंगुर्ला येथून झाली. कोकणचे सेनेवर आणि सेनेचे कोकणवर प्रेम आहे. आमचे विद्यमान खासदार, आमदार हे आंदोलनासाठी नाही तर विकासकामांसाठी मला फोन करतात. आमच्या लोकप्रतिनिधींनी इथे विकासाची कामे केली. याचा मला सार्थ अभिमान असल्याचे सांगून त्यांनी कौतुक केले. विरोधकांना इथे इंचभरही जागा शिल्लक राहणार नाही, हे सुभाष देसाई यांनी सांगितले ते मला आता पटत आहे, असे आदित्य म्हणाले.