शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

मोर्ले-पारगड रस्त्याचे काम रेंगाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2016 00:09 IST

निधी आहे पण निविदा नाहीत : बांधकाम विभागाकडून चालढकल

वैभव साळकर -- दोडामार्ग -सिंधुदुर्ग-कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले-पारगड या महत्त्वाकांक्षी रस्त्याला नऊ कोटी रूपयांचा निधी मंजूर होऊनही बांधकाम विभागाच्या वेळकाढू धोरणामुळे या रस्त्याचे काम अद्यापही रेंगाळले आहे. या रस्त्यासाठी पाच कोटीचा निधी मंजूर आहे. तर सन २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात चार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, निविदा प्रक्रिया राबविण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळ घालवल्याने प्रत्यक्ष कामास सुरूवात झाली नाही. त्यामुळे कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पर्यटनदृष्ट्या जोडणाऱ्या या महत्त्वाकांक्षी रस्त्याच्या कामाला खीळ बसली आहे. दोडामार्ग आणि चंदगड या दोन्ही तालुक्यांच्या सीमेवर वसलेल्या शिवकालीन किल्ले पारगड या पर्यटन स्थळाला आणि कोल्हापूरमार्गे-दोडामार्गहून गोवा राज्यालाही अगदी जवळचा मार्ग म्हणून मोर्ले-पारगड हा महत्त्वाकांक्षी रस्ता प्रस्तावित करण्यात आला होता. कोल्हापूर-सिंधुदुर्गला पर्यटनदृष्टया जोडणाऱ्या मोर्ले-पारगड रस्त्याबाबत गेली कित्येक वर्षे चर्चा होत होती. मात्र, प्रत्यक्षात या रस्त्याची संकल्पना वास्तवात उतरत नव्हती. ज्या क्षेत्रातून रस्ता जात होता, त्या सिंधुदुर्गातील तिलारी परिसरात काही ठिकाणी वनसंज्ञेचा अडथळा या रस्त्याला येत होता. मात्र, तत्कालीन विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांनी स्वत: या कामात लक्ष घालत या रस्त्याच्या काही भागात येणाऱ्या वनसंज्ञेचा अडथळा दूर करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात तेवढीच जागा देण्याचे मान्य केले. त्याप्रमाणे दोन वर्षांपूर्वी वनखात्याला संपादित जागेच्या बदल्यात अन्य ठिकाणी जागा देण्यात आली. त्यामुळे गत चार वर्षात या रस्त्याचे काम मार्गी लागेल, अशी आशा होती. त्यासाठीच तत्कालीन उपवनसंरक्षक नरेश झुरमुरे, बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी स्वत: जाऊन मोर्ले-पारगड रस्त्याची पाहणी केली. या पाहणी दरम्यान हा रस्ता किती वनसंज्ञेने व्यापला आहे तसेच या रस्त्यात किती वृक्षांची तोड होऊ शकते, याचा संपूर्ण अहवाल तयार करण्यात आला होता. तर मोर्ले-पारगडमधील कोल्हापूरकडील रस्ता करण्यात आला असून, उर्वरित रस्ता वनसंज्ञेच्या अडथळ्यामुळे खोळंबला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर हा रस्ता वेगाने मार्गी लागेल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यानंतर तीन वर्षे पूर्ण होत आली तरी ही अपेक्षा काही पूर्ण होऊ शकली नाही.चंदगड व दोडामार्ग या दोन्ही तालुकावासियांची या रस्त्यासाठी आग्रही मागणी असल्याने तत्कालीन विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांच्या पुढाकारातून या रस्ता साकारणीचे कामही हाती घेण्यात आले होते. मोर्ले ते पारगड हा जवळपास बारा किलोमीटरचा रस्ता आहे. दरम्यान, मोर्ले येथून सुमारे ५ किलोमीटर रस्त्यापैकी काही जमीन ही वनखात्याची असल्याने व खाजगी जमिनीलाही काही अंशी वनसंज्ञा असल्याने वनखात्याने या रस्त्याच्या कामाला हस्तक्षेप केला. त्यानंतर या रस्त्याचे काम रखडत राहिले. मात्र, विकासाच्या दृष्टीने हा रस्ता होणे गरजेचे आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा मोर्ले-पारगड हा रस्ता मार्गी लागल्यास गोव्यात येणारे विदेशी पर्यटक निश्चितच दोडामार्गहून शिवकालीन किल्ले पारगड आणि तेथून पुढे आंबोली व घाटमाथ्यावर वळतील. शिवाय चंदगड तालुक्यातील याच रस्त्याचे सुमारे पाच-सहा किलोमीटरपर्यंतचे रस्ता निर्मितीचे प्राथमिक काम पूर्णही झाले आहे. त्यामुळे तेथील पर्यटन वृद्धिंगत होईल. तर मोर्ले-पारगड हा रस्ता पुढे दोडामार्ग तालुक्यातून गोवा राज्याला जोडणाराही अत्यंत जवळचा मार्ग असल्याने दोडामार्ग तालुक्यातील पर्यटन विकासालाही चालना मिळणार आहे. त्यामुळे नियोजित मोर्ले-पारगड रस्त्याच्या पूर्णत्वासाठी तातडीने हालचाली होणे आवश्यक आहे.९ कोटी तरतूद : पूर्ण झाल्यास पर्यटन वाढणार कोल्हापूर व गोवा राज्याला दोडामार्ग मार्गे जोडणाऱ्या मोर्ले-पारगड या महत्वाकांक्षी रस्त्यासाठी ९ कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी पाच कोटीचा निधी मंजूर असून, चार कोटीच्या निधीची तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. मात्र, असे असले तरी निविदा प्रक्रिया राबविण्यास बांधकाम विभागाने वेळकाढू धोरण अवलंबिल्याने रस्त्याच्या कामास सुरूवात झालेली नाही. हा रस्ता पूर्ण झाल्यास गोवा आणि पश्चिम महाराष्ट्र कमी अंतराने जोडण्यास मदत तर होणारच; शिवाय सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील पर्यटन वृध्दिंगत होण्यासही हातभार लागेल. त्यामुळे मोर्ले-पारगड रस्ता लवकरात लवकर पूर्ण होण्याची गरज आहे.तिलारी धरणासाठी उत्तम पर्यायअत्यंत धोकादायक समजल्या जाणाऱ्या तिलारी (रामघाट) घाटासाठी मोर्ले-पारगड रस्ता उत्तम पर्याय ठरणारा मार्ग आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यास तिलारी घाटातील अवजड व जीवघेणी वाहतूकही थांबेल. त्यामुळे बांधकाम विभागाने कागदी घोडे नाचविण्यात वेळ न दवडता लवकरात लवकर मोर्ले-पारगड रस्त्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.नियोजित मोर्ले-पारगड रस्ता मार्गी लागल्यास शिवकालीन किल्ले पारगडला अधिक झळाळी प्राप्त होणार आहे.