शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

महिला सरपंचास लाच घेताना अटक

By admin | Updated: June 10, 2015 00:34 IST

वेताळबांबर्डेतील घटना : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

कुडाळ : स्मशानभूमीच्या बांधकामाच्या बिलाचा धनादेश देण्यासाठी तीन हजारांची लाच ठेकेदाराकडून घेताना वेताळबांबर्डेच्या महिला सरपंच रोहिणी राजन चव्हाण यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सापळा रचून रंगेहात पकडले. वेताळबांबर्डे गडकरीवाडी येथील स्मशानभूमीच्या बांधकामाचे काम तेथीलच गावातील गोविंद यादव या ठेकेदाराने घेतले. हे बांधकाम १ लाख ८९ हजार ३२८ रुपये इतक्या रकमेचे होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर या कामाचे बिल पाच टक्केप्रमाणे अदा केले पाहिजे होते. या बिलाचा एक धनादेश यादव यांना यापूर्वी मिळाला होता. आता फक्त १७ हजार ३८८ रुपयांचा धनादेश वेताळबांबर्डे ग्रामपंचायतीकडून येणे बाकी होता. हा धनादेश लवकरात लवकर देण्यात यावा, अशी मागणी ठेकेदाराने सरपंच चव्हाण यांच्याकडे केली असता त्यांनी धनादेश देण्याकरिता तीन हजार रुपये देण्याची मागणी केली. यानंतर ठेकेदार यादव यांनी वेताळबांबर्डेच्या सरपंच तीन हजार रुपयांची लाच मागत असल्याची तक्रार कुडाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात ३ जून रोजी केली. यादव यांनी केलेल्या तक्र ारीची छाननी करण्यासाठी ५ जून रोजी सरपंच चव्हाण यांचे फोन टॅप करण्यात आले. यावेळी त्यांनी तीन हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. ६ जून रोजी लाच घेताना रंगेहात पकडण्यासाठी वेताळबांबर्डे ग्रामपंचायतीकडे सापळा रचण्यात आला. मात्र, सरपंच चव्हाण ग्रामपंचायतीत आल्या आणि फक्त तीन मिनिटांत निघून गेल्याने त्यांना त्यादिवशी पकडता आले नाही. ७ रोजी ग्रामपंचायत बंद, तर ८ जून रोजी सरपंच नसल्याने सापळा रचता आला नव्हता. गेले सहा ते सात दिवस लाचलुचपत विभागाचे अधिकारी चव्हाण यांना पकडण्यासाठी योग्य वेळ शोधत होते. अखेर ९ जून रोजी लाचलुचपतने वेताळबांबर्डे ग्रामपंचायतीच्या बाहेर सापळा रचत ठेकेदार यादव यांना सरपंच चव्हाण यांना पैसे देण्यासाठी पाठविले व तीन हजार रुपयांची लाच घेताना चव्हाण यांना रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ठाण्याचे अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक मुकुं द हातोटे, पोलीस निरीक्षक अनिल कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक एल. डी. राणे, पोलीस हवालदार बुधाजी कोरगावकर, मकसूद पिरजादे, साक्षी पवार, कर्मचारी नीलेश परब, सुनील देवळेकर, आशिष जामदार, महेश जळवी यांनी केली. (प्रतिनिधी)लोकप्रतिनिधीवरील पहिलीच कारवाईसिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकप्रतिनिधीला लाच घेताना रंगेहात पकडण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. लाच घेताना पकडण्यात आलेल्या सरपंच चव्हाण यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना बुधवारी ओरोस न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. स्मशानभूमीला त्यांनीच जमीन दिलीखरे तर ज्या ठिकाणी स्मशानभूमी आहे, ती जमीन सरपंच चव्हाण यांच्याच कुटुंबीयांनी दिली असून, त्यांना खोट्या राजकारणात अडकविल्याची चर्चा परिसरात सुरू होती. महिला सरपंचास लाच घेताना अटकवेताळबांबर्डेतील घटना : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाईकुडाळ : स्मशानभूमीच्या बांधकामाच्या बिलाचा धनादेश देण्यासाठी तीन हजारांची लाच ठेकेदाराकडून घेताना वेताळबांबर्डेच्या महिला सरपंच रोहिणी राजन चव्हाण यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सापळा रचून रंगेहात पकडले. वेताळबांबर्डे गडकरीवाडी येथील स्मशानभूमीच्या बांधकामाचे काम तेथीलच गावातील गोविंद यादव या ठेकेदाराने घेतले. हे बांधकाम १ लाख ८९ हजार ३२८ रुपये इतक्या रकमेचे होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर या कामाचे बिल पाच टक्केप्रमाणे अदा केले पाहिजे होते. या बिलाचा एक धनादेश यादव यांना यापूर्वी मिळाला होता. आता फक्त १७ हजार ३८८ रुपयांचा धनादेश वेताळबांबर्डे ग्रामपंचायतीकडून येणे बाकी होता. हा धनादेश लवकरात लवकर देण्यात यावा, अशी मागणी ठेकेदाराने सरपंच चव्हाण यांच्याकडे केली असता त्यांनी धनादेश देण्याकरिता तीन हजार रुपये देण्याची मागणी केली. यानंतर ठेकेदार यादव यांनी वेताळबांबर्डेच्या सरपंच तीन हजार रुपयांची लाच मागत असल्याची तक्रार कुडाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात ३ जून रोजी केली. यादव यांनी केलेल्या तक्र ारीची छाननी करण्यासाठी ५ जून रोजी सरपंच चव्हाण यांचे फोन टॅप करण्यात आले. यावेळी त्यांनी तीन हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. ६ जून रोजी लाच घेताना रंगेहात पकडण्यासाठी वेताळबांबर्डे ग्रामपंचायतीकडे सापळा रचण्यात आला. मात्र, सरपंच चव्हाण ग्रामपंचायतीत आल्या आणि फक्त तीन मिनिटांत निघून गेल्याने त्यांना त्यादिवशी पकडता आले नाही. ७ रोजी ग्रामपंचायत बंद, तर ८ जून रोजी सरपंच नसल्याने सापळा रचता आला नव्हता. गेले सहा ते सात दिवस लाचलुचपत विभागाचे अधिकारी चव्हाण यांना पकडण्यासाठी योग्य वेळ शोधत होते. अखेर ९ जून रोजी लाचलुचपतने वेताळबांबर्डे ग्रामपंचायतीच्या बाहेर सापळा रचत ठेकेदार यादव यांना सरपंच चव्हाण यांना पैसे देण्यासाठी पाठविले व तीन हजार रुपयांची लाच घेताना चव्हाण यांना रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ठाण्याचे अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक मुकुं द हातोटे, पोलीस निरीक्षक अनिल कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक एल. डी. राणे, पोलीस हवालदार बुधाजी कोरगावकर, मकसूद पिरजादे, साक्षी पवार, कर्मचारी नीलेश परब, सुनील देवळेकर, आशिष जामदार, महेश जळवी यांनी केली. (प्रतिनिधी)