शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

टोळक्याकडून पोलिसासह महिलांना मारहाण

By admin | Updated: November 28, 2014 23:51 IST

काहीजणांनी मद्यप्राशन केले होते,

मालवण : मालवण शहरात शुक्रवारी चारजणांच्या टोळक्याकडून पोलीस कर्मचाऱ्यांसह एका युवकाला तसेच काही महिलांना मारहाण करण्यात आली. ही घटना सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या टोळक्यातील काहीजणांनी मद्यप्राशन केले होते, असे घटनास्थळावरून सांगण्यात आले.मोठा जमाव जमल्याने यावेळी शहरातील वातावरण काहीकाळ तणावपूर्ण झाले होते. घटनेची माहिती समजाच पोलीस फाट्यासह पोलीस निरीक्षक विश्वजीत बुलबुले यांनी धाव घेतली. मात्र, गर्दीचा फायदा घेऊन मारहाण करणारे पळून जाण्यात यशस्वी झाले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तसेच या हल्लेखोरांना पकडण्यास पोलीस पथके रवाना करण्यात आली होती. शहरातील भरड नाक्याजवळून राजेश दीपक कामतेकर हा युवक आपल्या दुचाकीवरून घरी जात होता. याचवेळी त्याच्यासमोर दुचाकीवरून राजेश पारकर, साईराज पारकर, रणजीत पारकर हे तिघे पारकर बंधू आले. राजेश कामतेकर याला त्यांनी थांबविले. तो काही बोलायच्या आत तिघांनीही कामतेकर याला मारहाण करण्यास सुरूवात केली. कामतेकर याला बेदम मारहाण केल्यानंतर तिघेही युवक ट्रिपल सीट बाजारपेठेच्या दिशेने रवाना झाल्याचे समजताच वाहतूक पोलीस विठ्ठल धुरी व कदम यांनी त्यांचा पाठलाग करून बाजारपेठेमध्ये पकडले. ट्रिपल सीट पळत असलेल्या राजेश पारकर, साईराज पारकर, रणजीत पारकर यांनी वाहतूक पोलीस विठ्ठल धुरी यांनी पकडल्यानंतर त्यांनाही शिवीगाळ करीत तिघांनीही मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी तिथे आलेल्या कदम व परूळेकर या पोलीस कर्मचाऱ्यांवरही त्या युवकांनी हात उचलला. विठ्ठल धुरी यांचा राजेश याने हात पिळवटून त्यांचा मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक विश्वजीत बुलबुले काही पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी आले. मात्र गर्दीचा फायदा घेऊन मारहाण करणारे पळून जाण्यात यशस्वी झाले. दरम्यान, बाजारपेठेत मोठा जमाव जमला होता. संतप्त झालेल्या जमावाला शांत करणे पोलिसांना कठीण जात होते. अखेरीस जमावाला शांत करून मारहाण झालेल्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलीस कर्मचारी विठ्ठल धुरी यांना मारहाणप्रकरणी चौघाजणांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे बुलबुले यांनी सांगितले. दरम्यान, कामतेकर कुटुंबीयही तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले होते. (प्रतिनिधी)