शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
3
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
4
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
5
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
6
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
7
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
8
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
9
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
10
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
11
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
12
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
13
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
14
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
15
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
16
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
17
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
18
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
19
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
20
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

अर्भकाला पळविणारी ती महिला मनोरुग्ण

By admin | Updated: December 19, 2014 00:28 IST

दोडामार्ग पोलिसांकडून खुलासा

दोडामार्ग : परिचालिका असल्याचे सांगून दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयातील नवजात अर्भकाला पळवून नेणारी महिला मानसिक रुग्ण असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. ही महिला सावंतवाडी तालुक्यातील असनिये येथील असून मानसिक संतुलन बिघडल्याने तिच्याकडून असा प्रकार घडल्याचे दोडामार्ग पोलिसांनी सांगितले.बुधवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी महिलेकडून दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयातील तीन दिवसांच्या नवजात अर्भकास पळवून नेण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार घडला. त्यामुळे खळबळ उडाली होती. तेथील वार्डबॉय नीलेश बांदीवडेकर याच्या दक्षतेमुळे त्या महिलेला ताब्यात घेण्यास यश आले होते. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी संबंधित महिलेला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पोलीस तपासात ही महिला ही मानसिकदृष्ट्या ठिक नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच ती सावंतवाडी तालुक्यातील असनिये गावची असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी त्या महिलेच्या नातेवाईकांना बोलावून घेत त्यांच्या स्वाधीन केले.रुग्णालयामध्ये आचारसंहिता हवीदोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात घडलेल्या या प्रकारामुळे रुग्णालयातील भोंगळ कारभारदेखील पुढे आला आहे. रुग्णालयात बाहेरुन येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी कोणतीच आचारसंहिता नसल्याने असा प्रकार घडल्याचे बोलले जात असून रुग्णांना भेटण्यासाठी आचारसंहिता असण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)