शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

हत्तीने सोंडेत धरून महिलेला आपटले

By admin | Updated: June 5, 2014 00:31 IST

गंभीर जखमी : घावनळे ग्रामस्थांमध्ये घबराट

कुडाळ : हत्तीने घावनळे येथील मनुष्यवस्तीत घुसून, कामासाठी बाहेर पडलेल्या महिलेला सोंडेत धरून जमिनीवर आदळले. विजया विजय जाधव (वय ३५) असे तिचे नाव असून, गंभीर जखमी झाल्याने तिला गोवा-बांबोळी येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेमुळे बेसावध असलेला वनविभाग खडबडून जागा झाला आहे. हत्तीमुळे ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. घावनळे आंबेडकरनगर येथील परिसरात आज, बुधवारी पहाटे हत्ती दाखल झाला. याबाबत ग्रामस्थांना कोणतीच जाणीव नव्हती. तेथीलच विजया जाधव ही महिला घावनळे येथील कॅश्यू फॅक्टरीमध्ये कामाला जाते. रोजच्याप्रमाणे आज सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान ती कामावर जाण्यासाठी बाहेर पडली होती; परंतु घरापासून अवघ्या १० ते १५ फुटांच्या अंतरावरील झाडीत असलेल्या हत्तीने तिला सोंडेत धरून उचलून जमिनीवर आपटले. तिने आरडाओरड केल्याने जमा झालेल्या ग्रामस्थांनी हत्तीला हुसकावून लावले. या घटनेत विजया जाधव ही महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्या बरगड्यांना गंभीर दुखापत झाली आहे. तिला तत्काळ ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु अत्यवस्थ झाल्याने गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात हत्तींनी दोघांचा जीव घेतला असून, आता महिलेवरही जीवघेणा हल्ला केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (प्रतिनिधी) वनविभाग बेसावध गेल्या महिन्यात हत्तींनी दोघांचा बळी घेतल्यानंतर वनविभागाने ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी मोठी मोहीम हाती घेतली होती; परंतु त्यानंतर कोणतीही सावधानी अथवा सतर्कता बाळगण्यात आली नाही. त्यामुळे बेसावध झालेला वनविभाग या घटनेने खडबडून जागा झाला असून, घटनेनंतर जखमी विजया जाधव यांची वनविभागाच्या अधिकार्‍यांनी भेट घेतली.