जैतापूर : जिल्हा पोलिसांच्यावतीने राबवण्यात येणारा रेझिंग डे कार्यक्रम नाटे सागरी पोलीस ठाण्याच्यावतीने अत्यंत उत्साहात राबवण्यात येत आहे. यावेळी श्वानपथकाच्या विविध करामतीने उपस्थित महिला मंत्रमुग्ध झाल्या. गावपातळीवर राबवलेल्या या कार्यक्रमामुळे ग्रामीण महिलांना पोलिसी शस्त्रे हाताळण्याची संधी मिळाली.दि. २ जानेवारीपासून जिल्हा पोलीस अधीक्षक संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मेघना बुरांडे, सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून नाटे सागरी पोलीस ठाण्याच्या अनेक गावातून नियोजनबद्ध हा कार्यक़्रम राबवण्यात येत असून पोलीस व जनता सुसंवाद वाढण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहाण्यासाठी जनतेचे जास्तीत जास्त सहकार्य लाभावे यासाठभ परिसरातील गावांबरोबरच शाळांमधील विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधण्याबरोबरच विविध अत्याधुनिक शस्त्रांची माहिती प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून दिली जात आहे.याच उपक्रमाचे औचित्य साधत जिल्हा पोलीस अधीक्षक संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सागरी पोलीस ठाणे नाटेच्यावतीने रेझींग डेच्या निमित्ताने आंबोळगड येथे त्रिवेणी लोकसंचलित साधन केंद्र राजापूरच्यावतीने संपन्न झालेल्या महिला आनंदोत्सव कार्यक्रमात सुमारे ८०० ते ९०० महिलांसाठभ हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच गुन्ह्याचा शोध लावण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध अवजारांविषयी माहितीही देण्यात आली तर पोलिसांना तपासात प्रशिक्षित श्वान पथकाच्या माध्यमातून कसा उपयोग होतो हे दाखवण्यात आले. रत्नागिरीवरुन आलेल्या श्वानाच्या शोध घेताना दाखवण्यात आलेल्या करामतींनी उपस्थित हजारो महिला मंत्रमुग्ध झाल्या. याच कार्यक़्रमासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय शिंदे यांनी पोलीस बॅण्ड पथकही पाठवले होते. (वार्ताहर)
श्वानपथकाच्या करामतीने महिला मंत्रमुग्ध
By admin | Updated: January 5, 2015 23:20 IST